सिन्नर भाजपा प्रभारी आव्हाड यांची तरुणीस अश्लील शिवीगाळ सुषमा अंधारे यांनी पोस्ट केला व्हीडिओ

सिन्नर भाजपा प्रभारी आव्हाड यांची तरुणीस अश्लील शिवीगाळ
सुषमा अंधारे यांनी पोस्ट केला व्हीडिओ
नाशिक : प्रतिनिधी

सिन्नर तालुका भाजपचे प्रभारी जयंत आव्हाड यांनी तरुणीस अश्लील व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा एक व्हिडिओ शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत, हेच का भाजपचे संस्कार अशा प्रतिक्रिया नेटकरी यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, याप्रकरणी जयंत आव्हाड यांनीही सिन्नर पोलीस ठाण्यात संबंधित तरुणीविरुद्ध तक्रार अर्ज दिला आहे.

व्हिडिओ पोस्ट करतांना अंधारे यांनी म्हटले आहे की, संस्कार बघा भाजपाचे.. कष्टकरी मायमाऊली कार्यालयात झाडलोट, फरशी कामाचा दीड महिन्याचा पगार मागण्यासाठी गेली असता सिन्नरचा भाजप प्रभारी जयंत आव्हाडने त्या तरुणीस अश्लील व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली..
या महिलेची ३५४ नुसार विनयभंगाची तक्रारही पोलीस स्टेशनने घेतलेली नाही.आव्हाड यांची पोलिस स्थानकात ही तक्रार
दरम्यान ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर जयंत आव्हाड यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात दिलेला अर्ज समोर आला असून त्यात म्हटले आहे, सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीचे कार्यालय गाळा नं १२/१३, सुर्योदय संकुल येथे आहे. येथे काम करणाऱ्या तरुणीने कार्यालयातील 1 लाख रुपये चोरले. ही चोरी उघड झाल्यावर तिने पैसे चार दिवसांत आणून देईल, असे सांगितले. मात्र पैसे दिले नाही, ते परत मिळवून द्यावे असे अर्जात म्हटले आहे.

पहा व्हीडिओ

Bhagwat Udavant

Recent Posts

जयंत पाटील अखेर प्रदेशाध्यक्षपदावरून पाय उतार

जयंत पाटील अखेर प्रदेशाध्यक्ष पदावरून पाय उतार शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष नाशिकरोड : प्रतिनिधी राष्ट्रवादी…

19 hours ago

नाशिक जिल्हा परिषदेच्या त्या अधिकाऱ्यावर अखेर निलंबन कारवाई, लैंगिक छळ केल्याच्या तक्रारींची दखल

नाशिक प्रतिनिधी नाशिक जिल्हा परिषदेमधील एका वरिष्ठ विभागप्रमुखावर तब्बल ३० महिला कर्मचाऱ्यांनी लैंगिक शोषणाच्या तक्रारी…

1 day ago

येरे येरे पैसा ३’ मधील ‘उडत गेला सोन्या’ हे ‘जेन झी’ ब्रेकअप साँग प्रदर्शित

ईशान अमेय खोपकरचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण! ‘येरे येरे पैसा ३’ मधील ‘उडत गेला सोन्या’ हे…

3 days ago

मासिक पाळी तपासण्यासाठी विद्यार्थिनींसोबत केले असे काही… कुठे घडला नेमका हा प्रकार?

मासिक पाळी तपासण्यासाठी विद्यार्थिनींसोबत केले असे काही... कुठे घडला नेमका हा प्रकार? शहापूर : प्रतिनिधी…

3 days ago

मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाला गती

मालेगाव, नांदगाव तालुक्यांतील 21 गावांतील शेतकर्‍यांना नोटिसा मालेगाव : नीलेश शिंपी गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत…

5 days ago

जातो माघारी पंढरीनाथा…

महाराष्ट्रातूनच नाही, तर जगभरातून साधारण महिन्यापासून विठुरायाचा वारकरी आषाढी वारीच्या निमित्ताने पायी वारीत निघाला होता.…

5 days ago