घरगुती गॅस वाहनात भरणार्‍या संशयितास अटक

सिडको : विशेष प्रतिनिधी
घरगुती गॅस सिलिंडरमधून विनापरवाना व बेकायदेशीररीत्या गॅस खासगी वाहनांमध्ये भरून विक्री करणार्‍या आरोपीला गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईत 85 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
18 ऑगस्ट रोजी पोहवा नंदकुमार नांदुर्डीकर यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर पाटील गॅरेजच्या मागे, भारती मठाजवळ असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकण्यात आला. यावेळी विशाल बाजीराव बोंडारे (वय 29, रा. जयभवानी रोड) हा भारत गॅसच्या घरगुती सिलिंडरमधून गॅस मशिनच्या सहाय्याने खासगी वाहनांमध्ये भरताना आढळून आला. त्याच्याकडून आठ घरगुती गॅस सिलिंडर (भरलेले व रिकामे), दोन कॉम्प्रेसर मोटरयुक्त मशिन, एक वजनकाटा आणि 820 रुपये रोख रक्कम असा एकूण 85 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोहवा नितीन
फुलमाळी यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. ही कारवाई सपोनि हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेमचंद गांगुर्डे, यशवंत बेंडकोळी, नंदकुमार नांदुर्डीकर, संजय सानप, नितीन फुलमाळी व त्यांच्या सहकार्‍यांनी केली.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *