दिंडोरी: प्रतिनिधी
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दिंडोरी तालुक्यातील ननाशी येथे दाक्षिणात्य सिनेमा स्टाईल शेजाऱ्याची पिता पुत्राने कुऱ्हाड कोयत्याने शिर धडावेगळे करत शिर व कुऱ्हाड घेवून पोलीस स्टेशन ला दाखल झाल्याने परिसरात घबराट पसरली आहे.मागील दोन वर्षी पूर्वी मुलीचे लग्न मोडण्यास व आता मुलगी सासरहून बेपत्ता झाली यास मयत जबाबदार असल्याचे संशयावरून वाद होत हा खून झाल्याची प्रार्थामिक चर्चा असून पोलीस अधिक तपास करत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की ननाशी येथील गुलाब रामचंद्र वाघमारे व सुरेश बोके हे शेजारी शेजारी राहतात गेल्या दोन वर्षापासून वाद होते. त्यात मुलीचे ठरलेले लग्न मोडले यावरून वाद होता मुलगी सासरहून बेपत्ता झाली त्यास ही गुलाब जबाबदार असल्याचा संशय सुरेश बोके यांना येत त्यांचेत 31 डिसेंबर ला वाद झाला नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्व जण नव वर्षाचे स्वागत अन एकमेकांना शुभेच्छा देत असताना वाघमारे व बोके यांचे वाद उफाळून आला यावेळी सुरेश बोके व त्यांचा मुलगा विशाल बोके यांनी थेट कुऱ्हाड कोयत्याने गुलाब वाघमारे यांचे मानावर हल्ला करत शिर धडा वेगळे केले अन कुऱ्हाडी सह शिर घेवून पोलीस औट पोस्ट गाठले.घटनेची माहिती पेठ पोलीस ठाण्यात मिळताच पोलिसांचा फौज फाटा ननाशी येथे दाखल होत बंदोबस्त वाढविण्यात आला.परिसरात खळबळ उडत गावात घबराटीचे वातावरण पसरले .पोलिसांनी दोघा पिता पुत्रांना अटक करत तपास सुरू केला आहे.
नांदगाव: प्रतिनिधी मालेगाव येथील हॉटेल शिवा पंजाब येथे भाजीमध्ये झुरळ आढळून आले या संदर्भात व्यवस्थापक…
न्यूरो सर्जन वळसंगकर आत्महत्येला वेगळा अँगल नेमक्या कोणत्या कारणामुळे डॉक्टरांनी घेतल्या गोळ्या झाडून सोलापूर: सोलापूर…
नर्मदे हर ..... लेखक: रुपाली जाधव,सटाणा नर्मदा परीक्रमा पूर्ण करण्याचे स्वप्न गेल्या 2वर्षांपासून मनात घोळत…
*संकोच... लेखिका: अंजली रहाणे/थेटे *संकोच हा वैरी सत्याचा* *संकोच हा घात नात्याचा* संकोच अर्थात संशय…
*बीडचा बिहार आणि सरकारचा बधिरपणा!* *लेखिका : सीमाताई मराठे* धुळे. मो. 9028557718 लोकशाही प्रणालीत…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नाशिक दौरा अचानक रद्द नेमके काय कारण घडले? नाशिक: प्रतिनिधी राज्याचे…