नाशिक

धर्मांतर प्रकरणातील संशयितांना न्यायालयीन कोठडी

दुसर्‍या गुन्ह्यात पुन्हा पोलीस घेणार ताबा

सिडको : विशेष प्रतिनिधी
मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मल्टिनॅशनल आयटी कंपनीतील महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाच संशयित आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, या प्रकरणातील इतर गुन्ह्यांमध्ये संबंधित आरोपींना शनिवारी (दि. 11) पुन्हा अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नाशिकमधील एका आयटी कंपनीत काम करणार्‍या काही अधिकार्‍यांनी व कर्मचार्‍यांनी संगनमत करून आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील महिलांना व तरुणींना लक्ष्य केल्याचा आरोप आहे. त्यांना विविध ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार करणे, आर्थिक छळ करणे तसेच जबरदस्तीने धर्म स्वीकारण्यास भाग पाडल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
हा प्रकार मागील काही वर्षांपासून सुरू असल्याचे तपासात समोर आले आहे. एका पीडित महिलेने पुढे येत तक्रार केल्यानंतर प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर एकामागोमाग नऊ तक्रारी दाखल झाल्या आहेत. या प्रकरणात तौसिफ अत्तर, रझा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख आणि आसिफ अन्सारी या आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली होती. त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
दरम्यान, या प्रकरणातील फरार असलेली आणि ऑपरेशन मॅनेजर म्हणून कार्यरत असलेली अश्विनी चैनानी हिला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. तिच्या चौकशीतून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नाशिक पोलिसांकडे या प्रकरणात एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत.
पुढील तपासादरम्यान न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींना इतर गुन्ह्यांमध्ये पुन्हा अटक करून न्यायालयात हजर करण्यात येण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

7 minutes ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

13 minutes ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

18 minutes ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

24 minutes ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

39 minutes ago

लैंगिक अत्याचार करणार्‍या दोघा फरार आरोपींना अटक

सातपूर : प्रतिनिधी पीडित तरुणीला जिवे मारण्याची धमकी देऊन मॅक्स कॅफे तसेच आई-वडील घरी नसताना…

46 minutes ago