नाशिक : वार्ताहर
द्वारका परिसरातील काठे गल्ली येथे चार चारचाकी वाहनांची तोडफोड करत घरावर दगडफेक व दहशत पसरविणाऱ्या तिघा संशयितांना भद्रकाली पोलिसांनी अटक केली . ज्याठिकाणी तोडफोड करण्यात आली. त्या परिसरातून तिघा संशयितांची पोलिसांनी धिंड काढली. स्थानिक रहिवाश्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला. संशयित विकी शांताराम जावरे ३१ रा. संत गाडगे महाराज वसाहत, आगर टाकळी, भिमशक्ती नगर, टाकळी गाव, सुमित मिलिंद पगारे २६ रा. धम्मनगर, जुना कथडा, जाकीर हुसेन हॉस्पिटल जवळ, भद्रकाली, मंदार उर्फ निलेश कृष्णराव पवार २० रा. तपोवन सोसायटी, आठवण लॉन्स समोर, तपोवन यांनी बुधवारी ( दि. १ ) मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत रविंद्र हायस्कूल काठेगल्ली भागात बरखा विहार बंगल्यांसह परिसरातील बंगल्यासमोर उभ्या असलेल्या एम.एच. ०४ जी.यू. ८३२४, एम.एच. ४६ पी. ०७१६, एम.एच. १५ जी.ए. ५५१०, एम.एच.१५ डी.एस. २८०५ या चारचाकी वाहनांच्या काचा लाकडी दांडक्याने व दगडाने फोडल्या होत्या. शंकर नगर येथील कृपा निवास या घरावर दगडफेक करून संगीता शेळके यांच्या जिवीतास धोका निर्माण केला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भिंतीचे वातावरत निर्माण झाले होते.
भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला . सीसीटीव्ही फुटेज तपासत संशयितांना ताब्यात घेतले. या संशयितांची दहशत कमी करण्यासाठी गुरुवारी ( दि. २) र सकाळी भद्रकाली पोलिसांनी ज्या ठिकाणी दहशत माजवण्याच्या प्रयत्न करणार्या संशयिताची धिंड काढत. नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. यावेळी भद्रकाली वरीष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता पवार, गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर , भद्रकाली पोलीस ठाण्यातील अधिकारी व अमंलदार उपस्थित होते.
बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…
ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…
शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…
मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…
वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…
मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्या प्रवाशांची…