लाचखोर सुनीता धनगर चे निलंबन

लाचखोर सुनीता धनगर चे निलंबन

 

नाशिक : प्रतिनिधी

 

नाशिक महानगरपालिकेतील प्रशासनाधिकारी सुनिता धनगर यांना 55 हजारांच्या लाचे प्रकरणी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडत अटक केली होती. दरम्या या लाचखोर सुनिता धनगरचे शासनाकडून निलंबन करण्यात आले आहे. धनगर यांच्या लाच घेतल्याच्या प्रकरणामुळे पालिका वर्तुळासह शिक्षण क्षेत्रात खळ्बळ उडाली होती. धनगर यांनी पालिकेची लक्तरे वेशीला टांगली. न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली असून त्यांचे निलंबन करण्याचे आदेश शासनाने काढले आहे.

………

मुजोर आणि हेकेखोर स्वभावाच्या सुनिता धनगर यांच्यावर लाचलूचपत विभागाने ट्रॅप टाकत गेल्या आठवडयात कारवाइ केली होती. त्यांच्या घरी घेतलेल्या झाडाझडीत सापडलेली माया पाहून एसीबीच्या पथकाचे डोळे विस्फारले. दीड कोटीच्या घरातील झडतीत तब्बल 85 लाख रोख व तब्बल 32 तोळे सोने जप्त करण्यात आले. ही सपत्ती मिळून आल्यानंतरही दुसऱ्या दिवशी तीस लाखांची रक्कम बॅक खात्यात आढळून आली. यावरुन धनगर यांनी शिक्षण विभागात लावलेले लाचेचे दिवे सर्वासमोर आलेत. दरम्यान त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. आता मनपा शिक्षणाधिकारी चा पदभार पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी

मिता चौधरी यांच्याकडे देण्यात आला आहे. धनगर या लाचखोरीत अग्रेसर तर होत्याच शिवाय कार्यालयात भेण्यासाठी येणाऱ्या अभ्यंगतांना उणे दुणे बोलून त्यांची लायकी काढायच्या. अनेकांसमवेत असे प्रसंग घडले. कार्यालयीन कर्मचाऱ्यांना तर कधी कधी थेट अरे तुरेची भाषा केली जायची. त्यांच्यावर कारवाइ झाल्यानंतर या विभागातील शिपायापासून ते इतर कर्मचाऱ्यांमध्ये एकप्रकारे आनंदाचे वातावरण आहे. लाचखोर मनपा शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्या करणाम्यामुळे पालिकेची इभ्रत वेशीला टांगली गेली असून लाचेची मूळे कुठपर्यत गेली असेल. याचा विचारही करणे शक्य नाही. धनगर यांनी केलेल्या कारनाम्याची अजूनही पालिकेत चर्चा होते आहे. माझ्या विभागात कर्मचारी नसतानाही मीच एकटी काम करते, वरिष्ठांचे शिक्षण विभागाकडे लक्ष नसल्यांची कैफीयत सांगताना त्यांचे सतत रडगाणे असायचे. मात्र कारवाइ झाल्यानंतर सज्जनतेचा आव आणनाऱ्या धनगर यांचा चेहरा उघडा पडला आहे. शासनाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे आहे की, धनगर यांना आदेश असेल त्या कालावधी पर्यत त्यांचे कार्यालय पालिका हेच राहील. त्यांना शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *