स्वराज संघटनेची स्थापना, छत्रपती संभाजी राजेंची घोषणा
पुणे : मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. अपक्ष म्हणून काही दिवसांनी होणारी राज्यसभेची निवडणूक लढविणार असून, आपण स्वराज्य या नव्या संघटनेची स्थापना करीत असल्याची घोषणा छत्रपती संभाजी राजे यांनी आज पुण्यात केली. पत्रकार परिषदेत त्यांनी आगामी वाटचालीची दिशा स्पष्ट केली. स्वराज्य हे माझ्या नव्या संघटनेचे नाव असून या संघटनेचा प्रसार करण्यासाठी संपूर्ण राज्याचा दौरा करणार आहे, असे संभाजीराजे म्हणाले. महाराष्ट्रातील जनतेने आतापर्यंत छत्रपती घराण्यावर नितांत प्रेम केले आहे. या प्रेमापोटी मी महाराष्ट्र पिंजून काढू शकलो. 2007 पासून आतापर्यंत मी गोंदिया वगळता संपूर्ण राज्याचा दौरा केला आहे. मागील 15-20 वर्षांत शेतकर्यांचे, कामगारांचे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेऊ शकलो. लोक छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांवर प्रेम का करतात, हे मला अनुभवास मिळाले. त्यातून काम करण्याची उर्जा मला मिळाली. त्यातून काम करण्यासाठी मला एक नवी ऊर्जा मिळाली. हे लक्षात आल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:हून बोलावून मला राष्ट्रपती नियुक्त खासदार होण्याची विनंती केली. राष्ट्रपती नियुक्त खासदाराची प्रतिष्ठा वेगळी असते. त्यामुळे मी 2016 मध्ये ते पद स्वीकारले. आगामी काळात या संघटनेचे रुपांतर पक्षात करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…
जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…
र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…
षाढातील कोसळणार्या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…
नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…
शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…