सातपूर विभागात स्वराज्य पक्षाचा भव्य मेळावा

सातपूर विभागात स्वराज्य पक्षाचा भव्य मेळावा

कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा उत्साहात

नाशिक: प्रतिनिधी

पुणे येथे स्वराज्य पक्षाच्या होणाऱ्या २७ तारखेच्या मेळाव्याला नाशिक जिल्ह्यातून हजारो स्वराज्याचे मावळे उपस्थित राहणार असल्याची माहिती स्वराज्य संपर्क प्रमुख करण गायकर यांनी दिली.

स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजी महाराज यांच्या आदेशानुसार स्वराज्य पक्षाची सातपूर विभागाची बैठक व मेळावा रामजी हॉल,सातपूर कॉलनी,सातपूर नाशिक येथे झाला.या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी स्वराज्यचे प्रदेश संपर्कप्रमुख करण गायकर हे होते .मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष केशव गोसावी,उत्तर महाराष्ट्र सचिव शिवाजी मोरे, नाशिक जिल्हा प्रमुख प्रा.उमेश शिंदे, राज्य कार्यकारणी सदस्य विजय वाहुळे,ज्ञानेश्वर थोरात, नाशिक लोकसभा अध्यक्ष गुंडाप्पा देवकर,युवक जिल्हाप्रमुख नितीन दातीर,जिल्हा कार्याध्यक्ष नवनाथ वैराळ,कामगार आघाडी जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कोतकर,दिनेश नरवडे,व्यापारी आघाडी जिल्हाप्रमुख नारायण जाधव,जिल्हा सरचिटणीस सागर जाधव,युवा जिल्हा कार्याध्यक्ष गिरीश आहेर,उत्तर महाराष्ट्र प्रसिद्धीप्रमुख किरण बोरसे,नाशिक तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर सहाने,नाशिक तालुका अध्यक्ष महिला आघाडी सौ योगिता ढोकणे,जिल्हा संघटक निखिल बोराडे,इगतपुरी तालुकाध्यक्ष नारायण भोसले,त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष संतोष मिंदे,दिंडोरी तालुका अध्यक्ष सचिन पवार सुलक्षणा भोसले,रेखा जाधव, रेखा पाटील,मीनाक्षी पाटील,रागिणी आहेर,निशिगंधा पवार,नंदा चव्हाण,काजल देवरे,आशा पाटील यांसह पदाधिकारी उपस्थित होते.
या मेळाव्याला संपर्कप्रमुख करण गायकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, स्वराज्य पक्ष ज्या पद्धतीने वाढत आहे त्यावरून निश्चित सर्व राजकीय पक्षांना विचार करायला भाग पडणार आहे.आज एवढ्या मोठ्या संख्येने तरुण,महिला,ज्येष्ठ स्वराज्यात सहभागी होत आहे याचाच अर्थ आहे की राजकीय पक्ष तरुणांच्या,महिलांच्या अपेक्षा प्रश्न सोडविण्यात पूर्ण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. महाराष्ट्रात सध्या ज्या पद्धतीने राजकीय पक्ष गालिचा राजकारण करत आहे या राजकारणाला कंटाळून सर्वसामान्य घरातील तरुण,महिला,ज्येष्ठ हे स्वराज्य पक्षाला पसंती देत आहेत. त्याचच उदाहरण आजचा हा मेळावा व प्रवेश सोहळा आहे.यामुळे आपल्या सगळ्यांची जबाबदारी निश्चितपणे वाढत आहे, या सगळ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी कटिबद्ध राहिले पाहिजे,आपल्याकडे येणारा प्रत्येक मावळा हा सर्वसामान्य घटकासाठी काम करणारा असला पाहिजे,स्वराज्य पक्ष हा टाइमपास करण्यासाठी नाहीतर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आहे, फक्त शोबाजी करण्यासाठी पद घ्यायचे असतील तर अनेक पक्ष महाराष्ट्रात आहे परंतु स्वराज्याची जबाबदारी घेताना निश्चितपणे विचार करून घ्या कारण स्वराज्यात शिस्त व आचारसंहिता खूप महत्त्वाची आहे आणि ती आपल्या सगळ्यांना पाळावीच लागेल,जे स्वराज्याचे नियम पाळणार नाहीत त्या पदाधिकाऱ्यांना स्वराज्यात कुठेही जागा नाही.स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी महाराज हे स्वतः शिस्त पाळतात व संघटनेची ध्येयधोरण जगतात म्हणून आपली सुद्धा तितकीच जबाबदारी आहे की स्वराज्य वाढवत असताना स्वराज्याला कुठेही गालबोट लागेल असे कुठलेही कृत्य आपल्याकडून होता कामा नये याची सर्वांनी काळजी घ्यावी.आज नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून येणाऱ्या काळात नाशिक महानगरपालिका,जिल्हा परिषद,विधानसभा,लोकसभा या निवडणुका जिंकण्यासाठी आपण स्वराज्य पक्षाचे आचार विचार हे तळागाळातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करायचे आहे ते आपण निश्चित कराल याची आम्हाला शाश्वती आहे.
उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी, उत्तर महाराष्ट्र सचिव शिवाजी मोरे राज्य कार्यकारणी सदस्य विजय वाहुळे,नाशिक जिल्हा प्रमुख आशिष हिरे प्रा.उमेश शिंदे,ग्रामीण जिल्हाप्रमुख डॉ.रुपेश नाठे,महिला आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
या मेळाव्याचे यशस्वी आयोजन राज्य कार्यकारणी सदस्य नवनाथ शिंदे, किरण डोखे, जिल्हाप्रमुख आशिष हिरे,डॉ.रुपेश नाठे ग्रामीण जिल्हाप्रमुख,पुंडलिक बोडके युवक आघाडी नाशिक महानगरप्रमुख,नितीन पाटील युवक नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख,मनोरमा ताई पाटील
उत्तर महाराष्ट्र प्रमुख महिला आघाडी,राकेश कोर,वैभव दळवी अविनाश गायकर,प्रितेश पाटील आदींनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प.राम महाराज त्यांनी केले तर आभार प्रदर्शन राज्य कोर कमिटी सदस्य किरण डोके यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *