नाशिक

स्वराज्य संघटनेच्या एंट्रीने पदवीधर निवडणुक रंगतादार

 

बागलाण च्या सुरेश पवार मागे राहणार संघटना

नाशिक : प्रतिनिधी

राज्यातील पाचही विभागात अत्यंत चुरशीची आणि चर्चेत असलेली नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत आत्तापर्यंत दुरंगी होणारी निवडणूक आता तिरंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पदवीधर च्या रिंगणात असलेले सुरेश पवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थित स्वराज्य संघटनेत प्रवेश केल्याने निवडकित जबरदस्त ट्विस्ट आला आहे.

नाशिकच्या बागलाण येथील अपक्ष उमेदवार सुरेश पवार यांनी नुकताच स्वराज्य संघटनेत प्रवेश केला असून अधिकृत पाठिंबा मिळवला आहे. स्वराज्यप्रमुख
सुरुवातीपासून चुरस निर्माण झालेल्या नाशिक पदवीधर मतदार संघात दररोज नवनवीन घडामोडी घडत आहे. त्यातच आता स्वराज्य संघटनेचा पाठिंबा अपक्ष उमेदवार सुरेश पवार यांनी मिळवला आहे. त्यामुळे प्रारंभी दुरंगी, तिरंगी होणारी निवडणूक आता चौरंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान कसमादे परिसरात दांडगा जनसंपर्क असलेले सुरेश पवार स्वराज्य संघटणेचा झेंडा घेऊन कॉंग्रेसचे निलंबित अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि अपक्ष उमेदवारी आणि महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळवलेल्या शुभांगी पाटील व वंचित चे बनसोडे यांना टक्कर देणार आहे. त्यामुळे सुरुवातीपासून चुरशीची ठरत असलेली नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक आणखी रंगतदार होत आहे. काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस पाठिंबा मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करणाऱ्या सुरेश पाटलांना निराशा पदरी पडल्यानंतर त्यांनी स्वराज्याचा झेंडा हाती घेतला आहे. कॉंग्रेसची उमेदवारी मिळावी यासाठी सुरेश पवार स्वतः नाना पटोले यांच्या भेटीला गेले होते. तर दुसरींकडे शुभांगी पाटील यांना कॉंग्रेससह महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळाल्याने सुरेश पवार आता शिक्षक संघटना आणि स्वराज्य संघटनेच्या पाठिंब्यावर निवडणुकीत आपलं नशीब आजमावत आहे

Ashvini Pande

Recent Posts

कांद्याचे भाव गडगडणार

कांदा उत्पादकांवर ओढवणार आर्थिक संकट कांद्याचे भाव गडगडणार लासलगाव :- समीर पठाण गेल्या काही दिवसांपासून…

18 hours ago

यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल

यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल नाशिक:…

20 hours ago

वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही….

  वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…

2 days ago

मृत्यू पश्चातही आदिवासींच्या नशिबी  पुन्हा मरण यातनाच

मृत्यू नंतरही  आदिवासींच्या नशिबी  पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…

2 days ago

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाचे आज अधिवेशन

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त  आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…

2 days ago

त्र्यंबकेश्वर श्रावणी सोमवारी भाविकांसाठी रा. प.कडून 33 जादा बसेसची सोय

नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…

2 days ago