नाशिक : वार्ताहर
शेतकरी, कामगार, शिक्षकां सह वंचित घटकांच्या न्याय हक्का साठी स्वराज्य संघटना स्थापन केली आहे. शासन अन् राजकीय पक्षाकडून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण होत नसतील तर स्वराज्य संघटना वेळप्रसंगी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुक लढवेल असे संकेत नाशिक दौऱ्यावर आलेल्या छत्रपती संभाजी राजे यांनी दिले.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत छत्रपती संभाजी राजे बोलत होते. ते म्हणाले की,राज्य सरकारने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि विमा कंपन्यांवर नियंत्रण राखण्यासाठी काय नियोजन केले आहे. ते स्पष्ट करावे अशी मागणी स्वराज्य संघटनेचे संस्थापक तथा माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी मंगळवारी (दि.१८) केली आहे.
स्वराज्य संघटनेच्या स्थापनेनंतर छत्रपती संभाजी राजे राज्यभरात दौरा करीत असून नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला .यावेळी ते बोलत होते. शेजारच्या तेलंगणा राज्यात शेतकऱ्यांना कोणत्याही नूकसानीपूर्वीच अनुदान मिळते. ते महाराष्ट्रात का होऊ शकत नाही असा सवाल उपस्थित करतानाच हेक्टरी दिड लाखांची मदत जाहीर केली जाते. पण ती शेकऱ्यांना मिळते का अशी सासंकताही छत्रपती संभाजी राजे यांनी उपस्थित केली. आरोग्य, शिक्षण ,कामगार, शेतकरी आणि वंचितावंरील अन्याविरोधात लढण्याचा अजेंडा समोर ठेवून स्वराज्य संघटनेची स्थापना करण्यात आल्याचे स्पष्ट करतानाच गावागावात शाखा आणि घराघरात स्वराज्य संकल्पना घेऊन शेककरी कष्टकऱ्यांवरील अन्यायाविरोधात आपण राज्यभरात दौरा करीत असून सध्या राजकीय भूमिका घेण्याचा संघटनेचा विचार नसला तरी भविष्यात वेळ आल्यास संघटना राजकारणातही सक्रीय होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्रातील राजकारणात मोठी पोकळी
सध्याच्या राजकीय परिस्थितीत महाराष्ट्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून राज्यातीस असंस्कृत राजकारणाची राज्याबाहेरही चर्चा होत आहे. अशा परिस्थितीत जनता स्वराज्य संघटनेवर मोठ्या प्रमाणात विश्वास दर्शवित असताना संघटनेची जबाबदारी आणखी वाढली असल्याचेही माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी स्पष्टकेले.
स्वराज्य संघटना ही कोणताही राजकीय हेतू न ठेवता पूर्णपने सामाजिक उद्देशाने काम करत आहे. संघटनेची गाव तेथे शाखा अन् घरा घरात स्वराज अशी संकल्पना आहे.अन्याया विरोधात लढा देण्याचां संघटनेचा मुख्य उद्देशाने कार्य सुरू आहेत. नागरीकांची शासनाकडून कांमे होत नाही, असे ज्यावेळी लक्षात येईल त्यावेळी स्वराज्य संघटना निवडणुक आखाड्यात उतरणार असल्याचे राजेंनी राजेंचा राज्य भर दौरा सुरू असून नाशिकमध्ये सोमवारी (दि १७) दाखल झाले होते. दोन दिवसीय दौऱ्यात विविध कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला .शासकीय विश्रामगृह येथे विविध क्षेत्रातील मान्य वर व नागरिकांनी त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी स्वराज्य संघटनेचे राज्य प्रवक्ते करण गायकर, गणेश कदम आदी उपस्थित होते.
शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…
जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…
र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…
षाढातील कोसळणार्या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…
नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…
शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…