नाशिक

गोदावरी रामकुंड परिसरात चप्पलफेक करणार्‍यांविरोधात कारवाई करा

पुरोहित संघाचे पोलीस आयुक्तांना निवेदन

पंचवटी : प्रतिनिधी
शहर आणि परिसरात रंगपंचमीचा उत्साह असताना दुसरीकडे गोदावरी नदीतील रामकुंड व परिसरात रंगपंचमी साजरी करणार्‍या युवकांनी मात्र चपला फेकून अतिशय निंदनीय कृत्य केले आहे. त्याचा समाजमाध्यमांवर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याबाबत श्री गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाच्या वतीने तीव्र निषेध करत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदन दिले. गोदावरी रामकुंडात चप्पलफेक करणार्‍यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी पुरोहित संघाचे अध्यक्ष व विश्वस्त चंद्रशेखर पंचाक्षरी व अध्यक्ष सिंहस्थ समिती व प्रमुख विश्वस्त सतीश शुक्ल यांनी केली आहे.
रविवारी, दि. 8 रोजी पार पडलेल्या रंगपंचमी उत्सवानिमित्त शहरातील नागरिकांनी रंगपंचमीचा आनंद रामकुंड येथे घेतला. पण तो घेत असताना त्यांनी अतिशय अशोभनीय कृत्य केले, ज्या ठिकाणी आपण आपल्या गोदावरी नदीचा आई म्हणून उल्लेख करतो, रोजचे अस्थिविसर्जन, पिंडदान, श्राद्धादी कर्म, आपल्या पूर्वजांना मोक्ष मिळण्यासाठी देशभरातून भाविक येत असतात.
दर बारा वर्षांनी होणारा कुंभमेळा, देवाधिदेव महादेव कपालेश्वराची नित्य पालखी पूजा होत असते, अशा पवित्र आणि धार्मिक ठिकाणी गोदावरीच्या रामकुंडामध्ये चप्पल फेकून अतिशय घाणेरडे आणि निंदनीय कृत्य केले आहे. तसेच याठिकाणी गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाच्या तसेच समस्त नाशिककरांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.
गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाने या गोष्टीचा जाहीर निषेध केला आहे.
त्याचबरोबर संबंधित दोषी नागरिकांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीदेखील केली आहे. या घटनेचा समाजमाध्यमांवर व्हिडिओ व्हायरल झाला असून, तो पाहून कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

पोलिसांनी कठोर कारवाई करावी

रामकुंड येथे घडलेली घटना अत्यंत संतापजनक आहे. श्री गोदावरी नदीला आपण आईचा दर्जा दिला आहे. महिला दिनाच्या दिवशी कुंडात चप्पल फेकून आईरूपी नदीच्या पवित्रतेचा अपमान करणार्‍यांविरुद्ध तत्काळ चौकशी करून संबंधित व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. नाशिककरांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला या सूत्रानुसार प्रशासनाने कठोर कारवाई करावी. – देवांग जानी, गोदाप्रेमी

Take action against those throwing slippers in the Godavari Ramkund area.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

9 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

9 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

10 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

10 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

10 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

10 hours ago