शहरभरात मकरसंक्रातीचा उत्साह
नाशिक ःप्रतिनिधी
तीळगुळ घ्या आणी गोड गोड बोला अशा शुभेच्छा देत संक्रात साजरी होत आहे.नवीन वर्षातील मकरसंक्राती सण आज सर्वत्र साजरा होत आहे.शहर आणि उपनगरांमध्ये संक्रातीनिमित्ताने तीळगुळ देवून शुभेच्छा देत पतंगांची आकाशात रंगीबेरंगी चढाओढ पाहण्यास मिळत आहे.
संक्रातीपर्व काळात कठोर न बोलता स्नेह वृद्धंगत करावा मागील अबोला दूर करीत तीळगुळ देवून माङ्ग करावे नात्यातील स्नेह गोडवा वाढीसाठी शुभेच्छा संदेश दिला जात आहे.तीळगुळ,संक्रातीच्या पुजेसाठी ववसा उस बोरे,हरबरा,गव्हाच्या ओंब्या,बोळकी आदी खरेदीसाठी महिलांनी गर्दी केल्याचे चित्र होते.बच्चे कंपनीसह तरुणाईने पतंगांच्या स्टॉल्स्कडे मोर्चा बळविला होता.शहरातील मेनरोड,रविवार कारंजा,दहिपूल,पंचवटी कारंजासह उपनगरातील दुकांनामध्ये पंतग आणि मांजां घेण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र होते.
सक्रंातीनिमित्ताने पुरणपोळी,तीळगुळाची पोळी करण्यात येते. असे मानले जाते की, संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते. त्याचे कारण म्हणजे सूर्य या दिवसात दक्षिण ते उत्तर गोलार्धात फिरत असतो.दरवर्षी 14 जानेवारीला साजरी होणारी मकर संक्रांत यंदा लीप वर्ष असल्याने आज(दि.15)साजरी होत आहे.यंदाची संक्रांत वाघावर आरूढ असून उपवाहन घोडा आहे. देवीने पिवळे वस्त्र धारण केले असून हातात गदा घेतलेली आहे .दक्षिणेकडून उत्तरेकडे जात आहे,इशान्येकडे पाहत आहे,. संक्रांति काळात स्नान , दानधर्म , नामस्मरण असे पुण्य कृत्य केले असता फल शतपट होते .असे मानन्यात येते. मकर संक्रांतीचे वैज्ञानिक कारण म्हणजे सूर्य उत्तरायण झाल्याने प्रकृती मध्ये बदलांना सुरुवात होते. थंडीने गारठलेल्या लोकांना सूर्यदेवाच्या उत्तरायण होण्याने थंडीपासून बचाव होण्यास मदत होते.मकर संक्रांतीला खरीप हंगामातील पदार्थांनी या पर्वाचे स्वागत केले जाते.
संक्रातीला आर्वजून काळ्या रंगाचे कपडे परिधान करण्यात येतात.लहानमुलांचे बोरन्हान करण्यात येते , हलव्याचे दागिने,नववधूवर यांना तसेच भावी वधूवरांस यानिमित्ताने भेट देण्यात येते. मकर संक्रात ते रथसप्तमीपर्यंत पर्यत चालणार्या हळदीकुंकवाचा कार्यक्रम महिलांकडून आयोजन करण्यात येणार आहे.
अशी करतात संक्रातीची पूजा
स्वच्छ जागेवर पाट मांडून आसन मांडले जाते.पाटावर पाच मातीची बोळकी आणि त्यात उस,बोरे,हरबरा,नवीन धान्य,गव्हाच्या ओंब्या,तीळ आदी टाकून वस्त्राने झाकले जाते.हळदी कुंदू वाहून पूजा करण्यात येते.तीळगुळाचा,गोडाचा नैवेद्य दाखविण्यात येतो.घरी येणार्या महिलेला ववसाचे वाण दिले जाते.
नायलॉन मांजावर बंदी कायम
नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी असल्याने विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे.नायलॉन मांजामुळे पक्षी तसेच नागरिकांना रस्त्यावर अपघात होत असल्याने सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
संक्रांतीला वाण देण्याची चढाओढ
मकरसंक्रात ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचे कार्यक्रम आयोजीत करतात.यावेळी एकमेकींना हळदीककुं,तीळगुळ आणि वाण म्हणून संसारोपयोगी वस्तु दिल्या जातात.बाजारात खास वाणाच्या वस्तु उपलब्ध असून शहर आणि उपनगरांमध्ये विविध स्टॉल्स्वर विक्रीस ठेवण्यात आले आहे.दहा ते पाचशे हजार रूपयांपर्यंत वस्तु डझन किंवा अधिक खरेदी करण्यावर महिलांचा भर असतो.चांगले,उपयोगी तसेच पर्यावरणपूरक वाण देण्याकडे महिलांचा कल असतो.
घरात घुसला, अंगावर पेट्रोल टाकून पेटवले अन नंतर केले असे काही... नाशिक: …
काँग्रेस मेळावा नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा…
कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अभोणा उपबाजारात शेतकर्यांंनी गुरूवारी सुमारे 700 ट्रँक्टर मधून 15 हजार…
नाशिक : प्रतिनिधी गेल्या तीन चार महिन्यांपासून हा तिकडे चालला तो तिकडे चालला अशा अफवा…
नाशिक : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर केला होता.आगामी स्तानिक स्वराज संस्थेच्या…
नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न असला…