नाशिक : प्रतिनिधी
नाशिक पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीला प्रारंभ झाला असून, पहिल्या फेरीची मतमोजणी सुरू झाली आहे. प्रारंभीच्या कलानुसार सत्यजित तांबे हे आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील या पिछाडीवर आहेत. नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर झाल्यापासून चांगलीच चर्चेत आली होती. ऐनवेळी तांबे यांनी उमेदवारी अर्ज अपक्ष भरला. त्यामुळे शुभांगी पाटील यांना ठाकरे गटाने पाठिंबा दिला होता. पदवीधरसाठी 49.28 टक्के मतदान झाले. काल सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ झाला. एकूण 28 टेबल मांडण्यात आले असून, दुपारपर्यंत मतपत्रिकांचे गठ्ठे करण्यात आल्यानंतर दुपारनंतर मतमोजणीला प्रारंभ झाला आहे. एका टेबलावर प्रतिनिधींची संख्या जास्त असल्याने गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी पोलिसांना पाचारण करण्यात येऊन या प्रतिनिधींना बाहेर काढल्यानंतर आता मतमोजणी सुरळीत सुरू झाली आहे.