इंधन पुरवठा होणार ठप्प
टँकर चालकांचा आज पासून बेमुदत संप..
मनमाड: प्रतिनिधी
-केंद्र सरकारने वाहन चालकासाठी केलेल्या नवीन कायद्यामुळे ट्रक,टँकरसह सर्वच वाहन चालका मध्ये संतापाची लाट उसळली असून हा कायदा अन्याय कारक असल्याचा आरोप करत मनमाडच्या पानेवाडी,नागापूर परिसरात असलेल्या इंडियन ऑइल,भारत पेट्रोलियम,हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडेन गॅस कंपनीतुन इंधन आणि गॅस सिलेंडरची वाहतूक करणारे सुमारे 2 हजार पेक्षा जास्त टँकर आणि ट्रक चालकांनी आज पासून काम बंद आंदोलन सुरु केले.या संपामुळे ऑइल कंपन्याच्या प्रकल्पातुन राज्यातील वेगवेगळ्या भागातील पेट्रोल पंपावर केला जाणारा पेट्रोल डिझेलसह गॅस सिलेंडर पुरवठा ठप्प ठप्प झाला असून संप जास्त लांबल्यास पंपावर इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.हा कायदा जाचक आहे हा त्वरित मागे घ्यावा अशी मागणी संपकऱ्यांनी केली आहे.
केंद्र शासनाने केलेल्या नवीन कायद्यात काय आहे तरतूद
केंद्र शासनाने नुकताच भारतीय न्याय संहिता 2023 कायदा लागू केला असून त्यात अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेल्यास 10 वर्षे कारावास आणि 5 लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे.या कायद्यामुळे देशभरातील ट्रक, टँकरसह सर्वच वाहन चालका मध्ये असंतोष निर्माण झाला असून हा कायदा अति कठोर आणि अन्याय कारक असल्याचे वाहन चालकांचे म्हणणे आहे