टँकर चालक संपावर, इंधन पुरवठा थांबला
नाशिक : प्रतिनिधी
मनमाड पानेवाडी येथे एचपीसीएल बीपीसीएल तिन्ही कंपन्यांच्या टँकर चालकांनी संप पुकारला असून पाच-सहा जिल्ह्यांना होणारा पेट्रोल डिझेलचा पुरवठा पूर्णपणे थांबला आहे, त्यामुळे इंधन पुरवठा खंडित होऊन टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, भरलेले किंवा रिकामे टँकर डेपोच्या आत मध्ये लावले गेले पाहिजे . किंवा ते ज्या पंपांवर पाठवायचे तिकडे भरलेले टँकर निघून गेले पाहिजे. मात्र ते परिसरातील रस्त्यावर उभे केले जातात. त्यामुळे परिसरात अपघात होतात, या भागातील लोकांना त्रास होतो. टँकरमधून पेट्रोल, डिझेल चोरी सारख्या घटना घडतात. इंडियन ऑइलच्या डेपो समोर नागापूर ग्रामस्थ व टँकर चालक व मालक यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर ग्रामस्थांनी उभ्या असलेल्या गाड्यांच्या काचा फोडल्या. गॅस प्लांट मधून निघालेल्या एका चालकास मारहाण झाली. त्यानंतर ड्राइवर लोकांनी गाड्या भरण्यास नकार दिलेला आहे असे समजते . सकाळी भरलेल्या गाड्या कंपनीने नुकसान टाळण्यासाठी आऊट केल्या नाही . अजून तरी काही तोडगा निघालेला नाही .नाशिक,धुळे,जळगाव, नंदुरबार, औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड या जिल्ह्यांना मनमाडहून पेट्रोल व डिझेलचा पुरवठा होतो.या सर्व जिल्ह्यांचा इंधनपुरवठा थांबलेला आहे.
नाशिक शहर व जिल्ह्यात दुपारनंतर पेट्रोल पंप पुरवठ्याअभावी बंद पडण्यास सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.