इंदिरानगर| वार्ताहर |
वालदेवी नदीच्या पुलावरून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहातून जाण्याचे धाडस केल्याने सिडकोतील एक तरुण पाण्यात वाहून गेला. अग्निशमक दलाकडून छोटी बोट पाण्यात टाकून शोध सुरू आहे. अद्याप पर्यंत त्याचा कुठलाही तपास लागलेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय गणपत गारे( वय 22 वर्षे) व राहुल सुरेश घुगे (वय 24 वर्षे )दोघे रा. त्रिमूर्ती चौक, सिडको, हे पुलावर हात पाय धुण्यासाठी गेले असता पुलावरील शेवळामुळे पाय घसरून नदीच्या पाण्यात पडून बुडून वाहून गेला.
पुलावर पाण्यातून जाण्याचे त्यांनी धाडस केले . परंतु हेच धाडस त्यांच्या अंगाशी बेतले . राहुल हा पोहून किनारी लागला . विजय मात्र अद्यापर्यंत बेपत्ता आहे. रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती. पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ठाव लागत नव्हता. शिवाय अंधार झाल्याने शोध घेण्यास अडथळा येत होता. त्यामुळे शोधमोहीम तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.