नाशिक

शासकीय अनुदानासाठी करवसुली बंधनकारक

निफाड नगरपंचायतीची विकासकामांसाठी धडक वसुली मोहीम

निफाड : विशेष प्रतिनिधी
नगरपंचायतीस आर्थिक बाबतीत स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने तसेच वित्त आयोगाचा निधी, शासनाकडून मिळणारी अनुदाने मिळविण्यासाठी मालमत्ता कर व पाणीपट्टी कराची वसुली करणे बंधनकारक आहे. मात्र, निफाड नगरपंचायतीकडे मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुली कमी असून, वसुलीसाठी नगरपंचायत प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी कर भरण्याचे आवाहन केले आहे.
नगरपंचायतीची मालमत्ता करवसुली 45 टक्के झाली असून, पाणीपट्टी वसुली 30 टक्के झाली आहे. या उत्पन्नावरच पायाभूत सुविधा, स्वच्छता व्यवस्था, पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, दिवाबत्ती आदींचे नियोजन अवलंबून असते. शासनाकडून मिळणार्‍या योजनांच्या निधीसाठीही उत्पन्नाचे प्रमाण महत्त्वाचे मानले जाते. नागरिकांनी कर भरल्यास विकासाला गती मिळू शकते.

निफाड शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा व्यवस्था, विविध विकासकामे ही नगरपंचायत करावरच अवलंबून असल्याने नागरिकांनी कर भरून नगरपंचायतीस सहकार्य करावे.
-कांताबाई कर्डिले, नगराध्यक्षा, निफाड

Tax collection is mandatory for government grants.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

8 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

8 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

8 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

8 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

9 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

9 hours ago