filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 2;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: auto;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 35;
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश
नाशिक : प्रतिनिधी
महापालिका हद्दीत पुन्हा एकदा टीडीआर घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. शिवसेनेच्या नगरसेविका तथा स्थायी समिती सदस्या किरण गामणे यांनी 12 कोटींचा टीडीआर घोटाळा झाल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी दीड महिन्यात यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले.
स्थायी समितीची सभा मंगळवारी (दि.17) सभापती मच्छिंद्र सानप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आयुक्त मनीषा खत्री, नगरसचिव हरीश मदनचंद्र आदींसह सर्व विभागांचे प्रमुख होते. या प्रकरणात मनपाचे संबंधित अधिकारी, सोसायटीचे पदाधिकारी, तसेच व्यवहारात सहभागी व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
किरण गामणे म्हणाल्या की, राजसारथी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीच्या मालकीच्या जमिनीवर यूएलसी कायदा, डीपी रस्ता व इतर आरक्षण लागू असतानाही आवश्यक मंजुरी न घेता टीडीआर मंजूर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधित जमिनीचे सुमारे 39,500 चौ.मी. क्षेत्र असून, अतिरिक्त जमिनीचा चुकीच्या पद्धतीने वापर करून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे त्यांनी नमूद केले. अतिरिक्त जमीन शासनाच्या ताब्यात असतानाही तिचा व्यवहार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. नियमांनुसार अशा जमिनीवर टीडीआर लागू होत नसताना संबंधित अधिकार्यांनी नियमांकडे दुर्लक्ष करून मंजुरी दिल्याचा आरोप गामणे यांनी केला. दरम्यान, दुसर्या आणखी एका प्रकरणात गामणे यांनी इंदिरानगरमधील सर्व्हे क्र. 887 मधील गामणे कुटुंबाची फसवणूक करून, सेंट्रल विस्टा प्रकल्पासाठी बेकायदेशीर सात कोटींचा टीडीआर मंजूर केल्याचा खळबळजनक आरोपदेखील नगरसेविका किरण गामणे यांनी केला.
निवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याचा प्रस्ताव
महापालिकेतील वर्ग 2 व 3 मधील अधिकार्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 ऐवजी 60 वर्षे करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली. हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना दहा लाखांंखालील कामे ऑफलाइन विना निविदा पद्धतीने देण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला.
ठेकेदार म्हणतात, आयुक्त हमारे साथ!
आगर टाकळी परिसरात एसटीपीचे काम सुरू असताना संबंधित ठेकेदार कोण आहे, कोणाला काहीही माहिती नाही, तसेच संबंधितांशी बोलण्याचा प्रयत्न केल्यास आयुक्त आमच्यासोबत आहेत, तुम्ही कोण? अशा शब्दांत दबाव टाकत असल्याचा आरोप त्यांनी केला. हे ठेकेदार मुख्यमंत्र्यांचे माणसे असल्याचे सांगत असल्याचा गंभीर आरोप सदस्यांनी केला.
TDR scam worth Rs 12 crore in the city
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…
स्थायी सदस्य भारती ताजनपुरेंची मागणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेने यापुढे दहा लाखांच्या आतील कामे…