शिक्षक नेते के. के. अहिरे यांचे निधन
नाशिक: प्रतिनिधी
जेष्ठ शिक्षक नेते, लखमापूरच्या कादवा स्कुल चे माजी प्राचार्य, दैनिक गांवकरीचे जेष्ठ पत्रकार के. के. अहिरे यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. ते 63 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई,वडील, 2 मुले, सुना, नातू असा परिवार आहे. अतिशय मन मिळाउ स्वभावाचे असलेल्या अहिरे सरांचं सूत्रसंचलनाचे पुस्तक प्रकाशित झाले होते. शिक्षकांच्या प्रश्नाच्या सोडवण्यासाठी ते नेहमी सक्रिय असत. त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.