शिक्षकाकडून विद्यार्थ्याला जबर मारहाण
नाशिक: केवळ वही हरवली म्हणून इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थी आयुष् समाधान सदगीर याला शिक्षकाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केली असल्याची माहिती भगवान मधे यांनी दिली. इयत्ता तिसरी मध्ये शिकणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील आयुष समाधान सदगीर या विद्यार्थ्याला वही हरवली म्हणून शिक्षकाने जबर मारहाण केली. या शिक्षकावर तात्काळ गुन्हा दाखल करून निलंबित करण्याची एल्गार कष्टकरी संघटनेने मागणी केली आहे.
त्र्यंबक तालुक्यातील टाकेहर्ष येथील जिल्हा परिषद शाळेत ई 3मध्ये शिकत असलेल्या आयुष समाधान सदगिर या विद्यार्थ्याची वही हरवली या शुल्लक कारणावरून जबर मारहाण केली आहे. यघटनेने पालक वर्ग संतप्त झाला आहे.