शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत आ. दराडे यांचीच बाजी

शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत आ. दराडे यांचीच बाजी
नाशिक : प्रतिनिधी
विधानपरिषद निवडणुकीत नाशिक शिक्षक मतदार संघात महायुतीचे किशोर दराडे यांनीच बाजी मारत आमदारकी कायम राखली. अद्याप  अधिकृत घोषणा बाकी असली तरी विजय निश्चित झाला आहे. अपक्ष उमेद्वारामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या संदीप गुळवे यांना फटका बसला.
नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी सोमवारी (दि. 1)
अंबड वेअर हाऊस येथे मतमोजणीला दुपारी सुरवात झाली. पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेल्या दराडे यांनी आपली आघाडी अखेरपर्यंत कायम ठेवली. अद्याप अधिकृत घोषणा बाकी असली तरी विजयाची केवळ औपचारिकता उरली आहे.
अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे दुसऱ्या क्रमांकावर तर  ठाकरे गटाचे उमेदवार अॅड. संदिप गुळवे तिसर्‍या क्रमाकांवर फेकले गेल्याने ठाकरे गटासाठी हा धक्का आहे. विजयी कोटा 31 हजार 576 ठरवण्यात आला होता. . दरम्यान मतमोजणीत विजयाची मते कोणत्याही उमेदवाराला नसल्याने दुसऱ्या पसंतीची मते मोजली. त्यावर उमेदवाराचा विजय निश्चित  झाला आहे. अधिकृत घोषणा काही वेळातच होण्याची शक्यता आहे. मात्र कार्यकर्ते आतापासूनच गुलाल उधळत आहे.
नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये एकूण मतदान 64 हजार 853 झाली त्यापैकी 1 हजार 702 मते  अवैध ठरली तर 63 हजार 151 मते वैध धरण्यात आली.  राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक शिक्षक मतदारसंघ मतमोजणीत प्रथम मोजण्यात आलेल्या साठ हजार मतांमध्ये महायुतीचे शिंदे गटाचे उमेदवार आ दराडे यांनी ठाकरे गटाचे गुळवे व अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांना दणका देत पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली. सोमवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. दुपारी चार वाजेपर्यंत सर्व मतदान पत्रिकांची रसमिसळ करणे, त्यांचे गठ्ठे तयार करणे, प्रत्येक टेबलावर हजार मत पत्रिकांचे गठ्ठे मोजणीला देण्यात आले. मतमोजणीवेळी अवैध मतपत्रिका बाद करण्यात आल्या. सायंकाळी पाच नंतर मतमोजणीला सुरुवात झाली. साठ हजार मतमोजणीत दराडे यांनी पहिल्या फेरीत सर्वाधिक मते घेतली. विजयापर्यंत पोहचण्यासाठी उमेदवाराला 31 हजार मतांचा कोटा पूर्ण करणे शक्य न झाल्याने दुसऱ्या पसंतीची मते मोजण्यात आली. त्यात दराडे हे विजयी होण्याकडे वाटचाल करत आहे.
. किशोर दराडे यांच्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेळावा घेऊन ही जागा प्रतिष्ठा ची केली होती. उमेदवारांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.
Bhagwat Udavant

Recent Posts

मालेगावच्या त्या हॉटेलमध्ये भाजीत आढळले झुरळ

नांदगाव: प्रतिनिधी मालेगाव येथील हॉटेल शिवा पंजाब येथे भाजीमध्ये झुरळ आढळून आले या संदर्भात व्यवस्थापक…

6 hours ago

न्यूरो सर्जन वळसंगकर आत्महत्येला वेगळा अँगल, या कारणामुळे डॉक्टरांनी घेतल्या गोळ्या झाडून

न्यूरो सर्जन वळसंगकर आत्महत्येला वेगळा अँगल नेमक्या कोणत्या कारणामुळे डॉक्टरांनी घेतल्या गोळ्या झाडून सोलापूर: सोलापूर…

8 hours ago

नर्मदे हर

नर्मदे हर ..... लेखक: रुपाली जाधव,सटाणा नर्मदा परीक्रमा पूर्ण करण्याचे स्वप्न गेल्या 2वर्षांपासून मनात घोळत…

10 hours ago

संकोच

*संकोच... लेखिका: अंजली रहाणे/थेटे *संकोच हा वैरी सत्याचा* *संकोच हा घात नात्याचा* संकोच अर्थात संशय…

10 hours ago

बीडचा बिहार आणि सरकारचा बधिरपणा!

*बीडचा बिहार आणि सरकारचा बधिरपणा!* *लेखिका : सीमाताई मराठे* धुळे. मो. 9028557718   लोकशाही प्रणालीत…

10 hours ago

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नाशिक दौरा अचानक रद्द, नेमके काय कारण घडले?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नाशिक दौरा अचानक रद्द नेमके काय कारण घडले? नाशिक: प्रतिनिधी राज्याचे…

11 hours ago