पाकिस्तानचा 61 धावांनी उडविला धुव्वा
कोलंबो :
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात पार पडलेल्या टी-ट्ववेंटी विश्वचषकाच्या लीग सामन्यात भारताच्या संघाने पुन्हा एकदा पाकिस्तानी खेळाडूंना नेस्तनाबूत केले. महाशिवरात्रीच्या पावनपर्वावर पार पडलेल्या या सामन्यात भारताने विजयाचा अभिषेक घालत विजयावर शिक्कामोर्तब केले. 61 धावांनी भारताने पाकला धूळ चारली.
भारताच्या संघाने पहिल्या ओव्हरमध्ये विकेट गमावल्यानंतर ईशान किशनने खेळी सांभाळली, पण जेव्हा पाकिस्तानच्या संघाने पहिल्या तीन ओव्हरमध्ये तीन विकेट गमावल्यानंतर त्यांचा खेळ मात्र कोणाला सांभाळता आला नाही. भारतीय संघाने या विजयासह ‘सुपर 8’मध्ये प्रवेश केला.
पाकिस्तानचे पहिले तीन फलंदाज दोन अंकी आकडादेखील पार करण्यात अपयशी ठरले. पाकिस्तानच्या क्रिकेट गोलंदाजांची सामन्याच्या आधी बरीच चर्चा झाली; पण भारतीय फलंदाजांसमोर त्यांची डाळ शिजली नाही.
चर्चेत असलेला फरहान हा शून्यावर बाद झाला तर सॅम अयुबने सहा धावा केल्या आणि जसप्रीत बुमराह याने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. पाकिस्तानचा कर्णधार सलमानने चार धावा केल्या आणि जसप्रीत बुमराह त्याच्या पहिल्याच ओव्हर मध्ये दोन विकेट्स घेऊन भारताला विजयाच्या दिशेने अग्रेसर केले. पाकिस्तानच्या संघासाठी संघाचा फलंदाज उस्मान याने 44 धावांची खेळी खेळली पण तो पाकिस्तान विजयापर्यंत नेण्यात अपयशी ठरला. उस्मान खान आणि शादब खान यांची चांगली भागीदारी झाली होती पण अक्षर पटेल याने भारताला पाचवा विकेट मिळवून दिला. शादाब खान याने 14 धावा केल्या आणि तिलक वर्मा याने त्याला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. पाकिस्तानच्या संघाची या सामन्यामध्ये खराब फलंदाजी पाहायला मिळाली. हार्दिक पांड्याने भारताच्या संघाला एक विकेट मिळवून दिला त्यांनी त्याच्या पहिल्याच ओव्हर मध्ये विकेट घेतला तर जसप्रीत बुमराह याने भारताच्या संघाला त्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये दोन विकेट्स मिळवून दिले.
ईशानचा धमाका
डावाच्या सुरुवातीलाच हार्दिक पंड्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. शिवम दुबे सहाव्या क्रमांकावर खेळण्यासाठी आला होता. त्याने 17 चेंडूंत 27 धावांची (3 चौकार, 1 षटकार) महत्त्वपूर्ण खेळी खेळली. रिंकू सिंगनेही 4 चेंडूंत 11 धावा केल्या. मात्र, या डावाचा खरा हीरो ठरला ईशान किशन. ईशानने 40 चेंडूंत 10 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 77 धावा कुटल्या आणि पाकिस्तानी गोलंदाजांचे पार कंबरडेच मोडले.