त्र्यंबकेश्वरला भक्तांमध्ये नाराजी; आगामी पाच दिवस मंदिर पहाटे चारला उघडणार
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
देवदर्शन घेऊन जीवन कृतार्थ होईल, या अपेक्षेने आलेला भाविक दर्शन न घेता येथे आलेले वाईट अनुभव पदरी घेऊन माघारी जात असल्याने त्र्यंबकनगरीबाबत चुकीचा संदेश सर्वदूर पोहोचत आहे. आजच्या येथील ओंगळवाण्या प्रदर्शनाची किंमत भविष्यात पुढच्या पिढीला चुकवावी लागेल, असे दिसते.
नाताळ सुट्ट्यांमध्ये भक्तांची अलोट गर्दी होते आणि नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ती कायम राहते. यात आता अनपेक्षित असे काही राहिलेले नाही. मात्र, मंदिर व्यवस्थापन, त्र्यंबक नगरपरिषद प्रशासन आणि पोलीस यांनी याबाबत पूर्व नियोजन करणे आवश्यक आहे. त्र्यंबकेश्वर शहरात प्रवेश करताना दीड ते दोन किमी अंतर वाहनांच्या रांगा लागत आहे. नाशिक- त्र्यंबक प्रवासाला 45 मिनिटे लागतात, तर पेगलवाडी फाटा ते त्र्यंबकेश्वर शहरात येण्यासाठी एक तास लागल्याचे आणि बसमध्ये प्रवासी बसून राहिले. शहरात वाटेल तसे आणि वाटेल तेथे वाहने उभी केल्याने रस्त्याने चालणे अवघड झाले आहे. प्रत्येक चौकात वाहतुकीची कोंडी होत आहे. आजारी अत्यवस्थ असलेल्या रुग्णाला उपचारासाठी घेऊन जाणे कठीण होत असल्याने जीव गमावण्याची वेळ येत आहे. दर्शनासाठी आलेले भाविक पेड दर्शनाच्या तिकीट खिडकीवर काही तास आणि त्यानंतर पेड दर्शनाच्या रांगेत पाच तास उभे राहतात. थेट दर्शनाच्या नावाने सुरू असलेली सेवा केवळ पैसे कमावण्याच्या हेतूने सुरू आहे. ऑनलाइन तिकीट विक्री 2000 आणि ऑफलाइन 5000 असे 7000 तिकीट विक्रीतून देवस्थानला दररोजचे 14 लाख रुपये मिळत आहेत. पैसे कमावण्याच्या नादात भाविकांच्या हालअपेष्टा दुर्लक्षित झाल्या
आहेत. व्हीआयपी दर्शन बंद केल्याचे नियोजन ट्रस्ट जाहीर करत असताना त्यामध्ये राजशिष्टाचाराच्या नावाने सूट दिली जाते. त्याचा काही लोक फायदा घेतात आणि दर्शनाचा बाजार सुरू राहतो. हे वेळोवेळी निदर्शनास आलेले असताना देखील त्याकडे डोळेझाक केली आहे. सरसकट
व्हीआयपी दर्शन बंद ठेवणे, कोणाचाही हस्तक्षेप राहणार नाही, असे नियोजन केलेले दिसत नाही.
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या समोर चौकात भाविक गर्दी करतात आणि
व्हीआयपींकडे पाहून सोडतील म्हणून आशेने थांबून राहतात. येथे निवासाच्या सुविधा अपुर्या पडल्या आहेत. याचा लाभ घेत भाववाढ झाली आहे. खासगी प्रवासी सुविधेबाबत देखील तीच परिस्थिती आहे. भाविक रात्री रस्त्यावर मुक्काम करतात. मध्यरात्री कुशावर्तावर आंघोळ करतात व दर्शनबारीच्या बाहेर जाऊन अंधारात थंडीत थांबून राहतात. मंदिर पहाटे 5.30 ला खुले होते. रात्री 9 वाजता बंद होते. हजारो भाविक दर्शन न मिळाल्याने निराशेने माघारी जात आहेत.
न्यायाधीशांकडून दर्शनबारीची पाहणी
देवस्थान ट्रस्टच्या चेअरमन जिल्हा न्यायाधीश श्रीमती पी. व्ही. घुले यांनी येथील अनागोंदीची परिस्थिती लक्षात आल्यानंतर सोमवारी सकाळी तातडीने भेट दिली. दर्शनबारीसह सर्वत्र पाहणी केली. व्हीआयपींच्या नावाखाली चालणार्या प्रकाराबाबत माहिती घेतली. तसेच पुढील पाच दिवस मंदिर पहाटे चारला खुले होईल, असे आदेश दिले आहेत.
Temperatures will drop, the state will be in a state of panic सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…