मुंबई :
देशात सर्वत्र नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू आहे. मात्र, उत्तर भारतात सध्या दाट धुक्याची चादर पसरली आहे. यामुळे रेल्वे, विमान आणि रस्ते वाहतुकीला फटका बसला बसल्याने उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे, या बदलत्या हवामानाचे पडसाद आता महाराष्ट्रात, प्रामुख्याने विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात उमटणार असल्याचा अंदाज आहे.
गेल्या 24 तासांत जम्मू, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात दृश्यमानता 50 मीटरपेक्षाही कमी नोंदवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 30 डिसेंबरपासून हिमालयामध्ये एक नवीन ’वेस्टर्न डिस्टर्बन्स’ सक्रिय होत आहे. यामुळे उत्तरेकडून येणार्या थंड वार्यांचा जोर वाढणार असून, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या उत्तर भागात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र या शीतलहरीच्या कक्षेत नसला, तरी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या लगतच्या राज्यांमध्ये होणार्या तापमानातील घसरणीमुळे महाराष्ट्रावर परिणाम होणार आहे. विशेषत: विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रतील नागपूर, गोंदिया आणि नाशिकसारख्या जिल्ह्यांमध्ये येत्या दोन-तीन दिवसांत किमान तापमानात लक्षणीय घट होऊन हुडहुडी वाढणार आहे. सध्याच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस तापमानाचा पारा 2 ते 4 अंशांनी घसरण्याची शक्यता
आहे.
उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्रालाही तापमानामध्ये होणार्या या मोठ्या बदलाचा फटका बसू शकतो. ज्यात विमान आणि रेल्वे प्रवासाचा समावेश असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी जे पर्यटक उत्तर भारतात किंवा महाराष्ट्रातील उत्तर पट्ट्यात जाणार आहेत, त्यांनी थंडीमध्ये आवश्यक वस्तू घेऊनच बाहेर पडावे. तसेच धुक्यामुळे प्रवासी वाहनावर काय परिणाम होत आहे का? याची माहिती घ्यावी, असा इशारा देण्यात आला आहे.
Temperatures will drop, the state will be in a state of panic सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…