नाशिक : प्रतिनिधी
चंद्रग्रहण रविवारी भारतातदेखील दिसले. या पूर्ण चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी 3 तास 28 मिनिटे 2 सेकंद होता. चंद्रग्रहणाच्या वेळी धृती योग तयार झाला. चंद्रग्रहण रात्री 9.58 वाजता सुरू झाले. विशेष म्हणजे, हे पूर्ण चंद्रग्रहण म्हणजे ते पूर्ण ग्रहणापेक्षा मोठा भाग व्यापते. पूर्ण ग्रहण रात्री 11 वाजता सुरू झाले. कमाल ग्रहण रात्री 11.42 वाजता होते.
दरम्यान, चंद्रग्रहणामुळे शहरातील मंदिरे दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली होती. धार्मिक गोष्टींमध्येही ग्रहणाला महत्त्व आहे. यादरम्यान पूजा न करणे, जेवण न करणे, गरोदर महिलेने बाहेर न निघणे हेदेखील सांगितले जाते. हे चंद्रग्रहण फक्त भारतच नाही तर पूर्व आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका, चीन, जपान या देशांमध्येही दिसले. चंद्रग्रहण ही एक नैसर्गिक खगोलीय घटना आहे, ज्यामागे वैज्ञानिक कारणे आहेत. चंद्र हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते तेव्हा चंद्रग्रहण होते. 7 सप्टेंबर 2025 रोजीचे हे वर्षातील शेवटचे पूर्ण चंद्रग्रहण भारतातील अनेक भागात दिसले. हे ग्रहण रात्री 9.58 वाजता सुरू होऊन आणि पहाटे 1.26 पर्यंत चालले.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…