नाशिक

भाविकांना चप्पल स्टँडची सुविधा न पुरवणारे देवस्थान

त्र्यंबक नगरपरिषदेकडून उत्पन्नवाढीचा मार्ग; चपल स्टँडचा ठेका रद्दची अपेक्षा

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
देवाच्या दारी क्षणभर विसावा मिळेल, या आशेने त्र्यंबकेश्वर येथे आलेला भाविक येथील कमाईची हाव पाहता निराश होत आहे. भाविकाला चप्पल स्टँडची सर्वसाधारण सुविधादेखील मंदिर ट्रस्टने पुरवलेली नाही. यापूर्वी असलेल्या प्रशासकांनी यामधून उत्पन्नवाढीचा मार्ग शोधला आहे. मात्र, याच चप्पल ठेवण्याच्या वादात भाविकांना येथील व्यावसायिकांची शिवीगाळ आणि मारहाणीची दमदाटी सोसावी लागत आहे.
वास्तविक पाहता कोणत्याही मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांच्या चप्पल, बूट पादत्राणे ठेवण्यासाठी व्यवस्था केलेली असते. त्यासाठी काही मंदिरांमध्ये नाममात्र पैसे आकारले जातात तर काही ठिकाणी ती मोफत असते. देशविदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात मात्र अशी कोणतीही व्यवस्था असल्याचे दिसत नाही. त्यातही मंदिरात प्रवेश करण्यासाठी राजमान्य असलेले दरवाजे आणि गुप्त दरवाजे यांची संख्या जास्त असल्याने प्रत्येक दरवाजाला वेगवेगळी पद्धत अवलंबविण्यात येते. यामध्ये काही वेळेस वर्दळीच्या रस्त्यावर चप्पल काढून ठेवण्याची वेळ येते, तर एका दरवाजाला कुलपाच्या आत अशी सोय केलेली आहे. भाविक आत जाताना तेथे चपला काढून ठेवतात. मात्र, बाहेर येताना ते कुलूप बंद दरवाजाच्या बाहेर पोहोचतात.त्यावेळी त्यांना येथे हजर असलेल्या शिपाई कर्मचारी यांच्या नाकदुर्‍या काढत विणवन्या करण्याची वेळ येते. अशा वेळी नको ते दर्शन, असे उद्गार भक्तांच्या तोंडी आल्यास नवल ते काय?
दोन-अडीच वर्षांपूर्वी तत्कालीन प्रशासक व मुख्याधिकारी डॉ. श्रीया देवचके यांनी उत्पन्नवाढीचा मुद्दा पुढे करत त्याचे टेंडर काढले. भाविकांना पाच रुपयांप्रमाणे तीन ठिकाणी चप्पल स्टँड उभारले आणि त्याचा ठेका दिला. या माध्यमातून नगरपरिषदेला वार्षिक 12 लाख रुपये म्हणजेच महिन्याला एक लाख रुपये उत्पन्न मिळते हे दाखवले. वास्तविक पाहता मुख्याधिकारी या देवस्थान ट्रस्टच्या सचिव आहेत. मात्र, त्यांनी भक्तांचे हित न पाहता उत्पन्नाचा मार्ग शोधला. दरम्यान, एक स्टँड थेट वर्दळीच्या भागात अतिक्रमणात असल्याचे एका सुजाण नागरिकाने प्रांताधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले आणि तो चप्पल स्टँड बंद करण्यास भाग पाडले. दरम्यानच्या कालावधीत मुख्याधिकारी देवचके यांची बदली झाली. तेव्हा चप्पल स्टँडची ठेकेदारी नगरपरिषदेने बंद करावी, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे घडलेले नाही, यामागे या धंद्यात असलेली कमाई लक्षात घेतल्यास सर्वकाही स्पष्ट होईल. त्र्यंबकेश्वर मंदिरात एका दिवसाला 10 हजार भाविक आले व त्यापैकी 5 हजार भाविकांनी चप्पल स्टँडचा वापर केला तर दिवसाला 25 हजार रुपये मिळतात. संबंधित ठेकेदाराला 5 हजार रुपये खर्च वजा जाता 20 हजार रुपये शिल्लक राहतात. दिवसाकाठी 20 हजार रुपये कमाईचा गोरखधंदा बंद होईल, असे दिसत नाही. वास्तविक पाहता मंदिर ट्रस्टने येथे आलेल्या भाविकांना मोफत चप्पल स्टँड उपलब्ध करून दिला पाहिजे व त्यासाठी येणारा खर्च स्वतः करावा, अशी रास्त अपेक्षा भाविक
व्यक्त करतात.

नगरपरिषदेस 1 कोटी 75 लाखांचा यात्राकर अनुदान

शासनाने त्र्यंबकेश्वर शहराचा अ वर्ग तीर्थक्षेत्र आणि अ वर्ग पर्यटनस्थळ म्हणून समावेश केला व नगरपरिषदेला भरीव अनुदानाचा मार्ग मोकळा केला आहे. त्र्यंबक नगरपरिषदेला वर्षाकाठी 1 कोटी 75 लाख यात्राकर अनुदान मिळते. यामधून भक्तांंसाठी सुविधा निर्माण करणे, सेवा उपलब्ध करणे अपेक्षित आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट दर महिन्याला 10 लाख रुपये पाणीपुरवठ्याचे वीजबिल भरण्यास मदत अनुदान देत आहे. आतापर्यंत भाविकांच्या दानातील 3 कोटी रुपये देण्यात आले आहे. तरीही त्र्यंबक नगरपरिषद भाविकांना चप्पल ठेवण्याची सुविधा मोफत पुरवत नाही. देवस्थान ट्रस्टदेखील आपली जबाबदारी आहे असे मानायला तयार नाही. या मानसिकतेमुळे त्र्यंबकेश्वर येथे आलेल्या भक्तांंना नाडले व ताडले जाते, याकडे कोणाचेच लक्ष नाही.

Temples that do not provide slippers stand facilities to devotees

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

6 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

7 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

7 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

7 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

7 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

7 hours ago