महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षा मार्च एप्रिल 2022चा निकाल नाशिक प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यामार्फत मार्च एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवार दिनांक 17 जून दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. मंडळामार्फत मार्च – एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवार (दि 17 ) दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी मार्च एप्रिल 2022 परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे गुण खालील संकेतस्थळावरून उपलब्ध होतील सदर माहितीची प्रिंट येता येणार आहे मंडळाने जाहीर केलेल्या अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे दहावीचा नवीन निकाल येथे पाहता येणार दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती यामध्ये आठ लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर सात लाख 49 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यामुळे दहावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालक डोळे लावून बसले होते.मंडळाकडून 20 जून पर्यंत निकाल जाहीर होईल असे सांगण्यात आले होते त्यानुसार उद्या दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर होणार आहे. मार्च एप्रिल 2022 च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचे सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दोनच संधी श्रेणी आणि गुण सुधार योजनेअंतर्गत उपलब्ध असमाणार आहेत. जुलै-ऑगस्ट 2022 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षा अर्थी व श्रेणी सुधार विद्यार्थ्यांसाठी सोमवार दिनांक 20 पासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीने आवेदन पत्र भरून घेण्यात येणार आहेत विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वाटपाबाबत नंतर कळविण्यात येणार आहे
| |
www.maharesult.nic.in
http://sscresult.mkcl.org
कसबे सुकेणे येथील तिडके वस्तीवर जेरबंद झाला बिबट्या कसबेसुकेणे: येथील दशरथ पोपट तिडके यांच्या शेत…
सातपूर: प्रतिनिधी सातपूर एमआयडीसीतील ज्योतीस्ट्रक्चर कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली . या आगीचे कारण…
लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने कांद्यावरील…
मनमाड : प्रतिनिधी मराठीत एक म्हण आहे साधु संत येता दारी तोच दसरा दिवाळी ती…
ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम ! निर्णयाचे अंनिस कडून…
पारा ५.७ अंशावर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर! निफाड : प्रतिनिधी शहरासह तालुक्यात थंडीने मुक्काम. वाढविला आहे…