नाशिक

पंचवटीत काळ्या कोयत्याची दहशत

भरबाजारात तरुणाला लुटले, रोकडसह दुचाकी पळवली

पंचवटी : प्रतिनिधी
सिंहस्थनगरीतील गोदाकाठ पुन्हा एकदा गुन्हेगारांच्या दहशतीने हादरला आहे. पंचवटीतील मंगळ ग्रह मंदिर परिसरात ’मी या परिसराचा भाई आहे, माझ्या नादी लागला तर जिवंत मारून टाकेन’ अशी ओरडून दहशत माजवत, संशयितांनी एका तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दुर्गेश सुरेश वाघमारे (22, रा. कालिकानगर, पंचवटी) हा तरुण बुधवारी (दि. 11) रात्री साडेनऊच्या सुमारास आपला लहान भाऊ रोहित आणि मित्र ओम पवार यांच्यासोबत मंगळ ग्रह मंदिरासमोरील पटांगणात उभा होता. यावेळी दोन दुचाकींवरून आलेल्या चौघांनी त्यांना गाठले. संशयित विकी जाधव ऊर्फ काळ्या कोयत्या आणि सौरभ ऊर्फ सॅमसंग पोतदार यांनी आपल्या दोन अनोळखी साथीदारांसह फिर्यादीला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी काळ्या कोयत्याने हातातील धारदार कोयता हवेत नाचवत, ‘मी या भागाचा भाई आहे,‘ असे ओरडून तेथे उपस्थित नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. गर्दीच्या दिशेने धावून जात त्याने सर्वांना धमकावले.दहशत माजवल्यानंतर संशयितांनी फिर्यादी दुर्गेश याच्या खिशातील 1900 रुपयांची रोकड आणि त्याची अ‍ॅक्टिव्हा दुचाकी बळजबरीने हिसकावून घेत घटनास्थळावरून पोबारा केला. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पंकज सोनवणे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार

विकी जाधव ऊर्फ काळ्या कोयत्या, तसेच सौरभ ऊर्फ सॅमसंग पोतदार हे दोघेही रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. काळ्या कोयत्याविरुद्ध यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, प्राणघातक हल्ला, दरोड्याची तयारी, घरफोडी, चोरी, अपहरण यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. सॅमसंगविरुद्धही गुन्ह्यांची नोंद आहे. त्यास 30 डिसेंबर 2025 पासून शहरातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते. या आदेशाचे उल्लंघन करून तो शहरात गुन्हे करत असल्याचे समोर आले आहे.

Terror of black scythe in Panchavati

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

8 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

8 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

8 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

8 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

9 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

9 hours ago