नाशिक

इगतपुरी रेल्वेस्थानकावर दहशतवादी जेरबंद

रेल्वे पोलिसांकडून मॉकड्रील; प्रारंभी प्रवाशांमध्ये उडाली धांदल

इगतपुरी : प्रतिनिधी
सर्व पथके दाखल होताच रेल्वेस्थानकावर धाव घेऊन तपासणी करायला सुरुवात केली. यामुळे रेल्वेस्थानकावर छावणीचे स्वरूप आले होते. पोलिसांची रेल्वेस्थानकात धावपळ पाहून प्रवाशांचीही धांदल उडाली होती. अखेर पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना जेरबंद केले. मात्र, हे सर्व मॉकड्रील असल्याचे माहिती झाल्यावर प्रवाशांनी सुटकेचा
निःश्वास सोडला.
इगतपुरी रेल्वेस्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर वेटिंग रूममध्ये दोन दहशतवादी घुसून दरवाजा बंद करून बसले आहेत, अशी माहिती लोहमार्ग पोलीस ठाण्यात समजते.घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी शेंडगे यांनी घटनेची माहिती पोलीस अधीक्षक, इगतपुरी शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी, रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, इगतपुरी नगरपरिषद अग्निशमन दल अधिकारी, बॉम्ब फाइंडर डॉग पथक यांना दिली. रेल्वे सुरक्षाबल व लोहमार्ग पोलिसांनी तात्काळ या परिसराचा ताबा घेऊन सर्व परिसर निर्मनुष्य करून योग्य बंदोबस्त तैनात केला. घटनेची माहिती मिळताच नाशिक ग्रामीण एटीएस पथक अग्निशमन पथक, ग्रामीण रुग्णालय पथक, कल्याण येथील रेल्वे सुरक्षा बल डॉग युनिट व बॉम्ब फाइंडर डॉग जिमीसह घटनास्थळी रवाना झाले. यावेळी नाशिक ग्रामीणचे क्यूआरटी टीमने मोहीम राबवून वेटिंगरूमचा ताबा घेऊन दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले.
त्यांची तपासणी करून निशस्त्र करीत वेटिंग रूमच्या बाहेर आणले. त्यानंतर डॉग युनिट कल्याणचे पोलिस हवालदार जांभे, जाधव यांनी बॉम्ब फाइंडर, डॉग जिमी व रॉकी यांच्या मदतीने दोन संशयितांकडून मिळून आलेल्या बॅगची तपासणी केली.
काही बॉम्बसदृश वस्तू असल्याचे सूचित केल्याने बीडीडीएस पथकाने त्यांच्याकडील उपलब्ध सामग्रीने पुन्हा तपासणी करून बॅगेत सुतळी फटाके व घरगुती वापरातील चाकू, कपडे असे मिळून आल्याने या दोन संशयितांना बेवारस बॅगेसह इगतपुरी रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले.
दहशतवादी हल्ला व बॉम्बविरोधी तपासणी मोहिमेत रेल्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. जी. शेंडगे, पाच अंमलदार, रेल्वे सुरक्षा बल निरीक्षक शुक्ला, पाच अंमलदार, कल्याण डॉग युनिट पथक, नाशिक ग्रामीण क्यूआरटी पोलीस अंमलदार, एटीएस ग्रामीणचे पोलीस अधिकारी सय्यद, मालेगावचे पोलीस अधिकारी महाजन, पाच अंमलदार, इगतपुरी पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव, पीएसआय अमोल गायधनी, पाच अंमलदार, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. दीपक कुमार, प्रतीक जळकोटकर, रुग्णवाहिका, इगतपुरी नगर परिषदेचे अग्निशमन बंब, 9 अधिकारी, असे एकूण चाळीस जणांनी तसेच बॉम्ब फायटर डॉग जिमी, रॉकी यांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता.
दरम्यान, स्वातंत्र्य दिनानिमित्त वरिष्ठांच्या आदेशाने ही मोहीम राबवली. कोणताही दहशतवादी, घातपाताचा किंवा बॉम्बस्फोटसारखा प्रकार घडला नसून, ही मोहीम केवळ मॉकड्रील असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितल्याने प्रवाशांसह इगतपुरीकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

 

Gavkari Admin

Recent Posts

भाजपा नाशिक महानगर जिल्हा कार्यकारिणी जाहीर

नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार नाशिक : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या नाशिक महानगर जिल्ह्याची सन…

23 hours ago

रेशन दुकानदारांच्या मार्जिनमध्ये 20 रुपये वाढ

मंत्रिमंडळाचा निर्णय; दुकानदारांमध्ये नाराजी नाशिक : प्रतिनिधी राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या अंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या…

23 hours ago

नाशकात चारशे मतदान केंद्रे वाढणार

नगरविकासकडून निवडणूक आयोगाला प्रस्ताव सादर नाशिक : प्रतिनिधी शहरात होणार्‍या महापालिका निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची संख्या…

24 hours ago

जिल्ह्यात दहशत बिबट्याची, पर्वणी चोरांची

अफवांची गावभर चर्चा; ग्रामीण भागात नागरिकांचा जागता पहारा निफाड : तालुका प्रतिनिधी गेल्या काही दशकापासून…

24 hours ago

सिन्नरला अतिक्रमणांवर हातोडा; रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

मुख्याधिकारी कदम यांची धाडसी कारवाई सिन्नर : प्रतिनिधी अतिक्रमणे काढण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने आठवडाभर अगोदर नोटिसा…

24 hours ago

पाच कोटी द्या, दीड लाख मतांची सेटिंग करू देतो…

गुजरातच्या व्यक्तीने त्यावेळी संपर्क केल्याची माजी आमदार चव्हाण यांची माहिती सटाणा ः प्रतिनिधी ईव्हीएम मॅनेज…

1 day ago