नाशिकरोडला दहशतवाद्यांचा कट उधळला?

स्टेशनवर मॉकड्रील : प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड रेल्वेस्थानकात घातपात करून मोठी जीवितहानी करण्याचा दहशतवाद्यांचा कट सुरक्षा पथकांनी उधळून लावला. एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. तर दुसर्‍याला ताब्यात घेऊन बॉम्ब निकामी करण्यात आला. या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. तथापि, ही घातपातविरोधी कारवाईची रंगीत तालीम असल्याचे समजल्यावर सर्वांचा तणाव
दूर झाला.
नाशिकरोड रेल्वेस्थानक हे प्रमुुख व महत्त्वाचे स्थानक आहे.घातपातासंबंधी माहिती मिळताच संबंधित यंत्रणांचा कसा प्रतिसाद मिळतो, याचा अचानक आढावा घेण्यासाठी नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशव्दार येथे सायंकाळी मॉकड्रील झाले. नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या मुख्य प्रवेशव्दाराजवळ बेवारस बँग आढळून आल्याबाबत एका प्रवाशाने रेल्वे स्थानकाला कळवले. रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलाने तत्काळ सदर ठिकाणी हजर झाले. बॅगची चेन उघडी असल्याने त्यात दोन वायर असलेला बॉम्बसदृश दिसला. खबरदारी म्हणून परिसर निमर्नुष्य करण्यात आला.
नाशिक शहर पोलिस नियंत्रण कक्षाला याची माहिती कळविण्यात आली. बॉम्ब निकामी पथक आणि जलद प्रतिसाद पथकाचे तज्ज्ञ येथे हजर झाले. नाशिकरोड पोलिस ठाणे, अग्निशमन दल, बिटको रुग्णालयालाही कळवून त्यांची मदत घेण्यात आली. नाशिकरोडचे पोलिस, अग्निशमन दलाचे जवान, रेल्वेचे आणि बिटको रुग्णालयाचे डॉक्टर अ‍ॅम्बुलन्स व कर्मचार्‍यांसह हजर झाले. बॉम्बशोधक पथकाने बॅगचे निरीक्षण करून सदर शोधणार्‍या श्वानाकडून तपासणी केली. त्यात स्फोटके असल्याची खात्री झाल्याने पथकाने योग्यरीत्या बॅगची हाताळणी करून बॉम्ब निकामी केला. बॅग ठेवणार्‍या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता बॅग ठेवणारे दोन संशयित हे फलाट क्रमांक एकवर मुसाफिर खाना येथे
बसल्याचे दिसले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *