सातपूर भागात ठाकरे गट व राष्ट्रवादीला खिंडार पडणार

सातपूर भागात ठाकरे गट व राष्ट्रवादी ला खिंडार पडणार
नाशिक: प्रतिनिधी
आगामी महापालिका निवडणुकीसाठी आतापासूनच व्ह्यूव्य रचनेला सुरुवात झाली असून, काल काँग्रेस आणि उबाठा गटाच्या तीन माजी नगरसेवकानी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता सातपूर भागातही उबाठा आणि राष्ट्रवादी ला खिंडार पडणार आहे. नाशिक पश्चिम मतदार संघातील आमदार सीमा हिरे, महेश हिरे यांनी सातपूर भागातील शिवसेना पदधिकारी यांना सोबत घेत मुंबईत मंत्री गिरीश महाजन, भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. सातपूर भागातील रहिवासी आणि छावा क्रांतिवीर संघटनेच्या माध्यमातून तळागाळातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात नेहमी अग्रेसर भूमिका घेणारे करण गायकर यांच्या पत्नी सविता गायकर,
हेमलता कांडेकर, दिनकर कांडेकर, माजी महापौर दशरथ पाटील यांचे चिरंजीव प्रेम दशरथ पाटील, शिवसेनेचे उप महानगर प्रमुख समाधान देवरे ,राष्ट्रवादी चे बाळासाहेब जाधव यांनी बावनकुळे आणि गिरीश महाजन यांची भेट घेऊन पक्ष प्रवेशाबाबत चर्चा केली, बाळासाहेब जाधव यांचा यावेळी प्रवेश झाला, तर इतर पदाधिकारी यांचाही लवकरच प्रवेश होणार आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या प रा भ वाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन भाजपाने चांगले मोहरे गळाला लावण्याचे डावपेच आखले आहेत. आगामी काळात आणखी धक्के महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. सीमा हिरे यांनी नाशिक पश्चिम भागातून विजय मिळवल्याने त्या कमालीच्या सक्रिय झाल्या आहेत, महापालिका निवडणुकीत भाजप वर्चस्व मिळवण्यासाठी भाजप कामाला लागला आहे. सातपूर भागात गायकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे सविता गायकर,समाधान देवरे यांच्या प्रवाशाने भाजपला चांगला फायदा आगामी काळात होऊ शकतो, असे नागरिकांत बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *