शिवसेना उबाठाच्या सीमा पवारांचा महापौरपदासाठी, तर उपमहापौरपदासाठी शिंदेसेनेचे तिदमे, शिंदे, दिवेंचा अर्ज
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाची येत्या शुक्रवारी (दि.6) होणारी निवडणूक बिनविरोध होईल, अशी अपेक्षा बाळगणार्या भाजपला मित्रपक्ष असलेल्या शिंदेसेनेने धक्का दिला. शिंदेसेनेचे सहसंपर्कप्रमुख विलास शिंदे, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे व राहुल दिवे यांनी उपमहापौरपदासाठी मंगळवारी (दि.3) अर्ज दाखल केला. शिंदेसेनेनंतर उद्धवसेनेच्या सीमा पवार यांनी महापौरपदासाठी अर्ज सादर केला. भाजपकडे स्पष्ट बहुमत असले, तरी शुक्रवारी होणारी महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.
नाशिक महापालिकेत भाजपने सर्वाधिक 72 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. अर्ज स्वीकृतीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे मंगळवारी भाजपने महापौर-उपमहापौरपदासाठी नावे जाहीर केली. दरम्यान, भाजपसोबत शिंदेसेनेने सत्तेत सोबत यावे, असा प्रस्ताव देणार्या भाजपने यू-टर्न घेत मंत्री गिरीश महाजनांनी आम्हाला कुबड्यांची गरज नसल्याचे केलेले विधान शिंदेसेनेच्या जिव्हारी लागल्याचे दिसले होते. त्यातूनच नाराज शिंदेसेनेने उपमहापौरपदासाठी अर्ज भरल्याचे बोलले जात आहे. पंधरा नगरसेवक असलेल्या उद्धवसेनेनेदेखील महापौर पदाची निवडणूक बिनविरोध होऊ द्यायची नसल्याने प्रभाग क्रमांक 15 मधील नगरसेविका सीमा पवार यांनी नगरसेवकांच्या उपस्थितीत आपला अर्ज सादर केला.
दरम्यान, नाशिक महापालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान पार पडले. 122 नगरसेवकांसाठी 31 प्रभागांत भाजप, शिंदेसेना, उद्धवसेना, राष्ट्रवादी (अ.प) यांच्या लढती झाल्या. 16 जानेवारीला जाहीर झालेल्या निकालात भाजपने एकहाती सर्वाधिक 72 जागा मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले. त्याखालोखाल शिंदेसेनेने 26 जागा जिंकल्या, तर उद्धवसेेनेने 15 जागा पटकावल्या. राष्ट्रवादीला केवळ 4 जागा मिळाल्या, तर काँग्रेस तीन, मनसे एक व अपक्ष एक यानुसार जागांचा निकाल लागला. भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध होण्याची अपेक्षा होती. मात्र, उद्धवसेना व शिंदेसेनेने महापौर, उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केल्याने शुक्रवारच्या घडामोडींकडे नजरा लागल्या आहेत.
भाजप-शिंदेसेनेत तडजोड?
शिंदेसेनेकडून उपमहापौरपदासाठी तिघांनी अर्ज सादर केले आहेत. मात्र, पडद्यामागे काही हालचाली झाल्यास भाजप शिंदेसेनेला उपमहापौरपद देऊ शकते, अशी चर्चा आहे. मुंबईत भाजपला शिंदेसेनेची आवश्यकता असल्याने नाशकात शिंदेसेना काही लाभाची पदे मिळवू शकते का, हे येत्या शुक्रवारी (दि. 6) होणार्या महासभेतून समजेल.
Thackeray group, Shinde Sena in fray for mayor, deputy mayor
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…