नाशिक : प्रतिनिधी
पहेलगामच्या (जम्मू-काश्मीर) भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत क्रिकेटचा सामना खेळण्यास हिरवा कंदील दाखवणार्या मोदी सरकारविरोधात देशभरात जनक्षोभ पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे हिंदुस्थान- पाकिस्तान सामन्या विरुद्ध माझं कुंकू- माझा देश या राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेच्या शेकडो रणरागिणी रविवारी (दि. 14) रस्त्यावर उतरून भाजपच्या दुप्पटी भूमिकेचा निषेध करत आंदोलन केले.
पहेलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 माता-भगिनींचे कुंकू पुसले गेले. त्यानंतर पाणी आणि रक्त एकत्र होऊ शकत नाही, असा दम भरत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पाणी रोखले. पाकिस्तानविरुद्ध सुरू केलेले ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही, अशा गर्जनाही मोदींनी केल्या. असे असताना पाकिस्तानसोबत आशियाई चषक क्रिकेट खेळण्यास मात्र मोदी सरकारने होकार दिल्याने त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.
हिंदुस्थान- पाकिस्तान सामना खेळण्यास परवानगी देणार्या केंद्र सरकारविरुद्ध शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती.त्यांच्या हाकेला साद घालत शिवसेना नाशिक जिल्हा महिला आघाडीच्या वतीने शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, शालिमार चौक, नाशिक येथे मोदी सरकारचा निषेध नोंदवून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. ‘मोदी सरकार हाय.हाय‘, ‘हामारा सिंदूर-हमारा देश‘, शिवसेना जिंदाबाद या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या वेळी बीसीसीआयचे अध्यक्ष जय शहा यांच्या प्रतिमेस बांगड्यांचा हार घालून जोडे मारण्यात आले. सौभाग्याचं लेणं मोदींना पाठवून निषेध नोंदवण्यात आला. राज्याच्या घराघरांतून माता-भगिनी पंतप्रधान मोदी यांना सौभाग्याचं कुंकू पाठवणार आहेत. या आंदोलनात शिवसेना कोअर कमिटी सदस्या भारती ताजनपुरे, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक स्वाती पाटील, जिल्हा समन्वयक कीर्ती जवखेडकर, उपजिल्हा संघटक शोभा दोंदे, फैमिदा रंगरेज, शोभा दिवे, युवती सेना अधिकारी योगिता गायकवाड, माजी नगरसेविका मनीषा हेकरे, म. आ. महानगर संघटक रंजना थोरवे, सुवर्णा काळुगे, शोभा पवार, महानगर समन्वयक मंदा गवळी, षा गायखे, विभाग संघटक ज्योती गोडसे, ज्योती कुमावत शिवसेना महिला आघाडी महानगर पदाधिकारी विठाबाई पगार, शारदा दोंदे, माधुरी पाटील, अश्विनी मते, कविता सरोदे, सुवर्ण कलंके, जयश्री खेताडे, अबोली कुमावत, जयश्री आहेर, सरला पाटील, शशिकला भोर, योगिता केदारे, शिवकन्या काळे, मनीषा माळी, रंजना गांगुर्डे, सविता कंक, रेखा कंक, ज्योती वर्धे, शोभा सातपुते, वंदना बनसोडे, भागीरथी चंडाई, वंदना गिरी, उषाबाई कांबळे, प्रमिला वैद्य, लता गुंबाडे, बबीता मोरे, मीराबाई फसाळे, शैला पिंगळे, धोंड्याबाई माळी, ज्योती बडदे, शोभा सातपुते, लता गुंबाडे आदींसह शेकडो महिला पदाधिकारी सहभागी
झाल्या होत्या.