पन्नासहुन अधिक पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात होणार प्रवेश
नाशिक : प्रतिनिधी
नाशिकमध्ये ठाकरे गटाला लागलेली गळती थांबवण्यासाठी खासदार संजय राऊत आज पासून दोन दिवस नाशिक दौऱ्यावर येत असतानाच शिंदे गटाने पुन्हा एकदा जोरदार धक्का दिला आहे. नाशिक शहराच्या विविध भागातील पन्नासहुन शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
खा संजय राऊत नाशिक दौऱ्यावर येत असताना पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाला राम राम केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान शिंदे गट अचूक टायमिंग साधून ठाकरे गटाचा करेक्ट कार्यक्रम करत असल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसापासून ठाकरे गटाला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाहीये, जानेवारी किंवा फेब्रुवारी च्या पहिल्या आठवड्यात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जाहीर सभा घेणार आहे. त्यासाठी राऊत नाशकात येऊन जागेची पाहणी करणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र याआधीच शिंदे गटाने पुन्हा एकदा मोठा धक्का ठाकरे गटाला दिला आहे.
हे पदाधिकारी करणार प्रवेश
योगेश बेलदार, अनिल साळुंखे, बापू लहुजी ताकटे, शिवा ताकाटे, अमोल सूर्यवंशी, योगेश चव्हाणके, प्रमोद लासुरे, रुपेश पालकर, संदेश लवटे, नाना काळे, उमेश चव्हाण, प्रमोद जाधव, संदीप डहाके, विनोद मुंगसे, शैलेश कारले, प्रसाद तांबट, प्रशांत आव्हाड, महेश जोशी, राहुल देशमुख, प्रशांत गाडगे, प्रशांत निकम, स्वप्नील गायकवाड, अजय निकम, राजेश गीते, महेश लोखंडे, अमित कटक, प्रमोद कालेकर, योगेश धामणकर, गोकुळ मते, विलास खैरनार, बाळू बोबरे, दर्शन काळे, राकेश मोरे, मोहित वराडे, अमित गांगुर्डे, समीर कांबळे, गणेश परदेशी, राहुल रंधरे, अमोल बराटे, अनिल निर्भवणे, प्रशांत निचळ, तकदीर कडवे, विशाल आहेर, आनंद भटकळ, उमेश गोणार, धीरज कडाळे, अमेय जाधव, गणपत मेनू, लक्ष्मण पाटील, मनोज उदावंत, अनिल नागरे, संदीप कदम, रवींद्र पेहरकर, पंकज भालेराव, अनिल शिंदे, संजय गवळी, योगेश सावकार, अभिजीत तागड इत्यादी पदाधिकारी प्रवेश शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.