नाशिक : प्रतिनिधी
नाशिक शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तब्बल 17 माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी मुंबईकडे रवाना झाल्याचे समजते आहे. नुकतेच नाशकात येऊन गेलेले खा. संजय राऊत यांनी ठाकरे गटात कोणतीही फूट अथवा बंड होणार नसल्याचा दावा केला होता. मात्र त्यांचा हा दावा फोल ठरण्याची शक्यता आहे. मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित हे प्रवेश होणार असल्याचे बोलले जातेय. एकाच वेळी एवढे प्रवेश झाल्यास याचा मोठा फटका ठाकरे गटाला बसेल. शिंदे गटात हे प्रवेश होणार असल्याचे शिंदे गटाचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांनी यास दुजोरा दिला आहे