नाशकात ठाकरे गटाला खिंडार, रात्री उशिरा वर्षा निवासस्थानी झाला प्रवेश सोहळा
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक मध्ये उद्धव ठाकरे गट अभेद्य असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी करून 24 तास उलटत नाही तोच माजी नगरसेवक आणि मनपातील माजी विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते यांच्यासह11 माजी नगरसेवक व मनसेचे शहर समन्वयक सचिन वाघ यांनी काल उशिरा वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेनेमध्ये प्रवेश केला,
नाशिकरोड येथील रमेश धोंगडे, सुवर्णा मटले,सुदाम डोमसे, पूनम मोगरे,
जयश्री खरजुल, सूर्यकांत लवटे, प्रताप महोरोलीय,चंद्रकांत खाडे यांनी शिंदे गटात प्रवेश केला, गेल्या काही दिवसांपासून हे शिंदे गटात जातील असे बोलले जात होते, शिवसेना अभेद्य असल्याचा दावा एकीकडे केला जात होता मात्र तो फोल ठरला आहे,
या प्रवेश सोहळ्यात खासदर हेमंत गोडसे सह इतर पदाधिकारी उपस्थित होते,
नाशिक शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तब्बल 10 माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले होते नुकतेच नाशकात येऊन गेलेले खा. संजय राऊत यांनी ठाकरे गटात कोणतीही फूट अथवा बंड होणार नसल्याचा दावा केला होता. मात्र त्यांचा हा दावा फोल ठरला आहे. मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित हे प्रवेश झाले, . एकाच वेळी एवढे प्रवेश झाल्याने याचा मोठा फटका ठाकरे गटाला बसला आहे. शिंदे गटात हे प्रवेश होणार असल्याचे शिंदे गटाचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांनी यास दुजोरा दिला होता,
अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी पाहा व्हिडीओ सिडको।…
सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…
पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…
मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…
नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…
जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…