नवीन नाका गंगापूर रोड कॉर्नरला एक नाश्ता केंद्र आहे. सकाळी आठ वाजता गरमागरम घरगुती पदार्थांचा दरवळ परिसरात दरवळत असतो.. पोहे, उपमा, वडा, इडली-सांबार इत्यादी इत्यादी. शाळा-कॉलेजचे विद्यार्थी हमखास तिथे आस्वाद घेताना दिसतात. स्वच्छताही वाटली. मालक तिशीतला युवक शिकलेला वाटत होता. बोलणेही मृदु होते.
मला राहवले नाही. मला वाटले नक्की कुणी सुगरण असावी त्याची आई किवा बायको घरी बनवून देत असणार त्याशिवाय अशी खास चव कशी येणार? त्याचे उत्तर ऐकून मला त्याचे एकदम कौतुक वाटले. रोज पहाटे चार वाजता उठून तो सारे किचन उरकून लवकर हजर होतो. फक्त एका कामगार मुलाची मदत असते. बायको दोन छोट्या मुलांना घेऊन गावाकडे राहते. मुलांच्या शिक्षणासाठी तो असे पैसे पाठवत असतो. माझे मृदु शब्द त्याच्या काळजाला भिडले असावे.
तो म्हणाला, वाटते तितके सोपे नाही माझ्यासाठी हे सर्व, पण काही इलाजही नाही. पुढच्याच क्षणी त्याचा चेहरा पुनश्च हसरा झाला. आणि तो कामालाही लागला.
आईचे गुणगान सगळे जग नेहमीच गात असते. पण असे बापही असतात की, ते केवळ मुलांसाठी खूप काबाडकष्ट करत असतात. तशी ती जगरहाटी असते.
तिचा महिला दिनाला सन्मान होतो, पण तिला सावरणारा तोही तितकाच आपले योगदान देत असतो. त्याच्यावर नेहमीच जबाबदार्यांचा डोंगर असतो. सोपे तर काहीच नसते त्यांच्यासाठी. जगण्याची लढाई दोघांना आहेच. यासाठीच वाटते की, महिलांनी स्वतःचा इतका उदो उदो का करवून घ्यावा? नाते तर दोघांचे पूरक आहे. एकमेकांविना अपूर्ण आहे, तरीही काही मूठभर स्त्रिया अशा असतात की, ज्यांना स्वतःच्यापलीकडे जग दिसतच नाही. आत्मसन्मान वगैरे ठीक आहे, पण अतिरेक नको असे मनापासून वाटते.
That poor… her Women’s Day
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…