“तो जेव्हा ती होते”

अंतरीचा आवाज भाग 6
“तो जेव्हा ती होते”

काॅलेजचे दिवस संपले होते. सुरवातीला मुली माझ्या शी बोलायला संकोच करायच्या पण कालांतराने माझा निस्वार्थी स्वभाव त्यांनी हेरला आणि छान गट्टी जमली. आता मनातले सारे गुपिते दिपक कडे शेयर होत होते… हा हा हा… मलाही आनंद होत असे मैत्रीणींच्या सुखद:खात सहभागी होताना… हे दिवस छान गेले…
आता मी पदवीधर झालो होतो. पण पुढे काय करायचे हा प्रश्न सतावत होता. माझं कशात मन लागत नाही हा घरात काळजीचा विषय झाला होता.
मित्र मैत्रीणी आपापल्या इच्छा इच्छा प्रमाणे सेटल होत होते.. अधूनमधून भेटी होत राही.. तेव्हा प्रश्न करायचे..
“काय रे दिपक काय करतोय सद्या… कुठे जाॅब वगैरे बघ ना”. माझ्या कडे उत्तर नसायचे… कारण मलाच समजत नव्हते मी नेमकं काय करावं….?
एक दिवस मला नाटक कंपनीकडून नाटकात एका कौटुंबिक स्री पात्रासाठी विचारणा झाली.. माझी आवड होतीच मी लगेच तयार झालो…
चार जावांची मी मोठी जावूबाईची भुमिका साकारली होती.. आणि त्या काळी जे नंबर वनचे हिरो कलाकार होते. त्यां अजय सरांची पत्नीचा रोल मला करायचा होता….आणि त्यांच्या सोबत काम मिळाले म्हणजे आपला अभिनय खूप चांगला असणे गरजेचे असायचे…अजय सरांसोबत काम करणाऱ्या व्यक्ती प्रसिद्ध होत असे..
आता तुम्ही म्हणाल, कि स्री पात्र करायला अनेक अभिनेत्री भेटू शकता मग माझीच निवड का केली?
तर त्या डायरेक्टर ने माझे नाटकातले काम बघितले होते आणि मी तेव्हा कमी पैशात सहज हुबेहूब स्री अभिनय करु शकत होते.
झाले काम सुरु काही न करण्यापेक्षा काही तरी काम सुरु झाले होते.हे घरातले समाधान होते…
आता माझा दिवसभर तालमीत नाटकाचा सराव होत असे आणि रात्री नाटकात काम करावे लागत होते…. दिवसेदिवस नाटकाला हाऊसफुल गर्दी होवू लागली…
हळूहळू अजय सर आणि माझ्यात छान मैत्री झाली जुळू लागली होती..रोज नाटकांचे संवाद नियोजनात सहभागी होत होतो..
आचार विचार जुळत होते.जेवायला जाणे गप्पा मारणे वाढत जात होते. नकळत आमच्यात जवळीकता वाढू लागली…
घरी जायला रोज रात्री उशीरा होत होता.. पण आता मला कुणाकडे पैसे मागावे लागत नव्हते. म्हणून मी कुणाला घाबरत ही नव्हतो..
घरुन निघताना मी शर्टपॅट घालून जायचो. आणि मेकअप रुममधे पुर्णपणे स्रीवेशात तयार होत होतो ते नाटक संपेपर्यंत तशाच भुमिकेत रहायचो.!
नाटक हाऊसफुल्ल रहायचे.. मोठ्या जावे या रोल निभावताना मला मजा येत होती.
अजयची पत्नी म्हणून पुर्णतः कौटुंबिक रोलमधे मी कुटुंब बांधून ठेवण्यात समजूतदार पणाचा रोल पार होतो..
प्रेक्षकांपैकी कुणालाही कळत नव्हते मी स्री नाही पुरुष आहे..! एवढे परफेक्ट काम चालू होते..
एक दिवस नाटक संपले आणि अजयने मला बाहेर जायचे का सोबत फिरून येवु जरा वेळ असे विचारले..
मी लगेच होकार दिला.. पण ते म्हणाले तू चेंज करु नको असंच चल..
मला जरा संकोच वाटला पण मी ओके म्हणत तयार झालो..
आम्ही गेटजवळ आलो वाचमेन हसला.. त्याला अजय सर म्हणाले आम्ही जरा वेळातच चक्कर मारून येतो..लाॅक करु नकोस..
रात्रीचे आठ वाजले होते.आम्ही स्कुटर वर समुद्राच्या दिशेने निघालो… ती थंडगार हवा कानाला झोपेत होती..माझ्या वेणीचा गजरा उडत होता.. केस गालावर भुरभुरत होते…
मी साडीचा पदर सांभाळत अजय सरांच्या खांद्यावर हात ठेवून बसलो होतो.जाताना क्षणभर कुणालाही वाटत असावे आम्ही नवराबायको फिरायला निघालोय…
मनोमन तर खुप छान वाटत होते पण वास्तव फार उलट होते याची जाणीव होताच आम्ही माघारी फिरलो..
गेटवर वाचमेन पुन्हा गालातच हसला.. मी संकोचलो..आणि पटकन मेकअप रुममधे जावून कपडे बदलून घरी निघालो…
अजय सर आता रोजच घरापर्यंत पोहचवायला येवू लागले.आमची मैत्रीचं रूपांतर प्रेमात होत होतं…!
हे समाजमान्य नसलं तरी मनातल्या भावनांना आवरता सावरता येणं कठीण होत असलं तरीही मी मात्र नकळत घाबरून स्वतः ला समजूत घालत होतो आणि कामाशी काम ठेवत होतो..
दिवस पुढे सरकत होते..आमची मैत्रीचे सुर घट्ट वीनत होते..नाटकातला पत्नीचा रोल खरं आयुष्यातलं स्वप्न बघत होतं जणू..!
असच एक दिवस अचानक….!

क्रमशः

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *