The Art म्हणजे कला प्रत्येक व्यक्तींमध्ये विविध कला असतातच. अतिसामान्य भाषेत वेगळा किडा प्रत्येक व्यक्ती मध्ये असतो. काही तरी वेगळे करण्याची खरंतर ती धडपड असते.
प्रत्येक व्यक्ती कुठल्यातरी एका विशेष कलेमध्ये पारंगत असते. काही कला या शिकवल्या जातात. काही कला या जन्मताच अंगात असतात. थोडक्यात कला म्हणजे काय की सुप्त गुण…
कुठलीही कला शिकण्यासाठी मनाची एकाग्रता, सातत्य, निरंतर प्रयत्न आणि मनापासून जिद्द लागते. तरच कुठलीही कला शिकतांना समोरची व्यक्ती त्यात पारंगत होऊ शकते. जीवन जगण्यासाठी बरेच लोक वेगवेगळ्या कला शिकतात आणि त्यात पारंगत झाल्यावर इतरांना शिकवून आपला उदरनिर्वाह ही चालवतात. कुठलीही कला अवगत असलेल्या माणसाला उपाशी राहायला भाग पाडत नाही.
काही लोकांकडे मुत्सद्दीपणानं वागुण आपलं काम काढून घेण्याचीपण कला असते. तसं तर या गोष्टीची कला म्हणून तुलना करण म्हणजे कलेची अपमानास्पद गोष्ट आहे.
स्वतःच स्वार्थ साधण्यासाठी गोड बोलून समोरच्याला न कळू देताही, पण कला गुणच आहे. जीवनात कुठली व्यक्ती कुणासाठी, कधी, काय आणि केव्हा, कसं करेल हे सांगणं तसं तर अशक्यच आहे.
काही व्यक्ती दुसर्‍याला वागायचं कसं हे सांगताना दिसतात, पण स्वतः मात्र कुठल्याच तत्वात म्हणजेच नियमात बसेल असं वागत नाही.
दुसर्‍यासाठी एक नियम आपल्यासाठी एक समोरच्याला पटवून मीच कसा बरोबर हे पटवून देणंसुद्धा कलाच आहे. जीवनात कुठली कला शिकायची असेल तर पडल्यावर आपलं आपण परत नव्याने उभ राहायला शिकावं. हार पचवायला शिकून परत नव्याने त्याच कामाला परत परत करावं त्यातच निपुण व्हावं जीवन जगताना तुम्ही पडला, हरलात तर हसणारे, टिंगल, अपमान करणारे खूप आहेत त्यांना शोधायचीपण गरज नसते. अपमानाचे आदरात रूपांतर करणं हीच खरी जीवन जगण्याची कला आहे.
जर अंतःकरण स्वच्छ असेल, नियत साफ असेल हेतू शुद्ध असेल, निरंतरता आणि कष्ट प्रामाणिक असतील तर निसर्ग, नियती आणि जगाचा नाथ कोळशाचा ही हिरा बनवतो ती त्याची अनाकलनीय कला आहे… हे त्रिकालाबाधित सत्य…

The Art

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

7 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

7 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

8 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

8 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

8 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

8 hours ago