घिबली अ‍ॅपची कमाल; मशालच्या जागी कमळ!

घिबली अ‍ॅपची कमाल
मशालच्या जागी कमळ!

मनमाड : आमिन शेख
सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज नव – नवीन अ‍ॅप उदयास येत आहेत. यातले अनेक अ‍ॅप हे मनोरंजक आहेत. या अ‍ॅपचे अनेकांना वेड लागते. असेच घिबिली नावाचे अ‍ॅप सद्या ट्रेन्डिंगला आहे. आपले फोटो टाकायचे आणि ते कार्टूनमध्ये इमेजेस तयार करून देतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही या अ‍ॅपने भुरळ घातली मात्र हे अ‍ॅप देखील भाजपचे आहे की काय? असा सवाल आता हे अ‍ॅप वापरणार्‍या व्यक्तीकडून केला जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मुलीच्या गळ्यात मशाल निशाणी असलेली मफलर टाकली मात्र  चक्क भाजपचे चिन्ह कमळ असलेले कार्टून तयार करून दिल्याने आश्चर्याचा धक्का बसला. अ‍ॅपने चक्क भाजपचे चिन्ह कमळ निशाणी असलेली इमेज दिली यामुळे या कार्यकर्त्यांने हे अ‍ॅप भाजपचे आहे की काय? असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *