सहा प्रभागांतील प्रचार तोफा थंडावणार

21 उमेदवारांसाठी 80 अधिकारी तैनात

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील उर्वरित सहा प्रभागांच्या नगरपालिकेचे मतदान येत्या 20 तारखेला होणार असल्याने आजपासून प्रचाराला पूर्णविराम लागणार आहे. प्रशासनाने निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी व्यापक तयारी पूर्ण केली असून, 21 उमेदवारांसाठी सुमारे 75 ते 80 अधिकार्‍यांचा ताफा तैनात करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील सात प्रभागांच्या निवडणुकांना निवडणूक विभागाकडून स्थगिती देण्यात आली होती. या कालावधीत सिन्नर येथील एका प्रभागाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. उर्वरित सहा प्रभागांसाठी येत्या 20 तारखेला मतदान होणार आहे. त्यामुळे आजपासून प्रचार थांबवण्यात येणार आहे. सर्व उमेदवारांचे निकाल 21 तारखेला जाहीर केले जाणार असल्याने सर्वांच्या नजरा त्याकडे लागून आहे. प्रशासनाने निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी काटेकोर नियोजन केले असून, एकूण 21 उमेदवारांसाठी 75 ते 80 अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. सिन्नर येथे 3 प्रभागांसाठी 8 उमेदवार रिंगणात असून, 12 मतदान यंत्रांवर मतदान होणार आहे. ओझर येथे 2 प्रभागांसाठी 8 उमेदवार असून, 5 मतदान यंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. चांदवड येथे 1 प्रभागासाठी 5 उमेदवार असून, 2 मतदान यंत्रांवर मतदान होणार आहे.
या सर्व निवडणूक प्रक्रियेसाठी एकूण 19 मतदान केंद्रांची निश्चिती करण्यात आली आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर संबंधित परिसरातील सर्व शाळांना निवडणूक आयोगाकडून दोन दिवसांची सुटी जाहीर करण्यात आली आहे.

ठिकाण    प्रभाग    मशीन    उमेदवार    वाहने
सिन्नर         3            12              8               7
ओझर          2            5                8               6
चांदवड         1            2                5               4

The campaign guns in six wards will cool down.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *