कमळ, घड्याळ, तुतारी अन् मशाल पेटणार
चांदवड : वार्ताहर
चांदवड नगरपरिषद निवडणुकीची प्रक्रिया आता अंतिम आणि निर्णायक टप्प्यात आली आहे., बुधवारी (दि. 26) शहरातील सर्व उमेदवारांना अधिकृतपणे निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले.
नगराध्यक्षपदासाठी 10 आणि नगरसेवकपदाच्या 20 जागांसाठी 84, असे एकूण 94 उमेदवार नशीब आजमावत आहेत. उमेदवारी अर्ज माघारीनंतर पाच दिवसांच्या प्रतीक्षेअंती बुधवारी चिन्हे हाती पडताच उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. शहराचे राजकीय वातावरण आता चांगलेच तापले आहे. तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. यावेळी महायुती, महाविकास आघाडी आणि अपक्ष उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमाने चिन्हे देण्यात आली.
नगराध्यक्षपदासाठी ‘काँटे की टक्कर’
शहराचे प्रथम नागरिक असलेल्या नगराध्यक्षपदासाठी (अनुसूचित जाती) यावेळी बहुरंगी लढत पाहायला मिळणार आहे. प्रमुख राजकीय पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. चिन्हवाटपात प्रमुख उमेदवारांना खालीलप्रमाणे चिन्हे मिळाली आहेत. वैभव बागूल (भाजप) कमळ, सुनील बागूल (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) घड्याळ, विकी जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट) तुतारी, शंभूराजे खैरे (शिवसेना उबाठा) मशाल.
या प्रमुख लढतींसोबतच अपक्ष उमेदवारांनीही रंजक चिन्हे मिळवत उपस्थिती दर्शवली. यात राजेश रमेश अहिरे (राजाभाऊ) यांना कपबशी, राकेश अहिरे यांना रिक्षा, जयेश पारवे यांना गॅस सिलिंडर, गोपी बडोदे यांना फॅन, रूपेश बागूल यांना नारळ, तर अशोक हिरे यांना बॅट हे चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे मतदारांसमोर आता स्पष्ट पर्याय उपलब्ध झाले आहेत.
प्रचाराचा धुरळा सुरू
चिन्हवाटपानंतर आता खर्या अर्थाने निवडणुकीचा ज्वर वाढला आहे. उमेदवार आता घरोघरी जाऊन पत्रके वाटप करणे, कोपरासभा घेणे आणि सोशल मीडियावरून आपले चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज झाले आहेत. नगरपरिषदेवर कोणाचा झेंडा फडकणार आणि नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
सरळ अन् तिरंगी लढतींचा थरार
एकीकडे नगराध्यक्ष पदासाठी दहा उमेदवार असताना,
प्रभागांत मात्र काही ठिकाणी सरळ, तर काही ठिकाणी चुरशीच्या लढती आहेत.
♦ प्रभाग 7 ‘ब’ मध्ये थेट लढत : येथील लढतीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. येथे राहुल शिरीषकुमार कोतवाल आणि जितेंद्र सयाजी पाटील (देवा पाटील) यांच्यात सामना रंगणार आहे.
♦ प्रभाग 10 मध्ये नात्यागोत्यांची लढत : प्रभाग 10 ‘ब’ (महिला राखीव) मध्ये योगिता नीलेश कोतवाल आणि लीलाबाई माधव कोतवाल या दोनच उमेदवारांमध्ये थेट लढत होत आहे. प्रभाग 10 ‘अ’ मध्ये विकी गवळी विरुद्ध संभाजी गुंजाळ असा थेट सामना आहे .
♦ प्रभाग 8 ‘अ’ मध्ये गर्दी : प्रभाग 8 ‘अ’ (अज महिला) जागेवर सर्वाधिक सात उमेदवार रिंगणात आहेत. येथे बेबी खैरे, सारिका घोलप, विशाखा जगताप यांच्यासह अपक्षांची संख्या जास्त असल्याने येथे चिन्हांचा प्रचार करणे उमेदवारांसाठी कसोटीचे ठरणार आहे.
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…