थंडीचा कडाका वाढला

नाशिक : प्रतिनिधी
शहरात गेल्या काही दिवसापासून वातावरणात बदल झाले असुन तापमानात घट झाली असुन  थंडीचा पारा अधिक वाढला आहे. यंदाच्या वर्षी थंडीचे प्रमाण कमी असल्याचे चित्र होते. नोव्हेंबर महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात  थंडी पडली होती. मात्र नंतर तापमान वाढून ऐन हिवाळ्यात उकाडा वाढला होता. मात्र गेल्या चार दिवसापासून शहरात थंडीचा कडाका वाढला आहे. शहरासह ग्रामीण भागातही थंडीचे प्रमाण वाढले आहे. निफाडला निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे.मागील दोन दिवसांपासून शहरात थंडीचा कडाका वाढला आहे. यंदाच्या वर्षी तापमानात दुसर्‍यांदा घसरण झाली असुन थंडीचा कडाका  वाढल्याने नाशिककर चांगलेच  गारठले आहेत. तापमान कमी झाल्याने दिवसभर वातावणात गारवा जाणवत आहे.
परिणामी शहरात आता निरभ्र आकाश आणि कडाक्याची थंडी असे  चित्र आहे.  दरवर्षीच नाशिक मधील कडाक्याची थंडी राज्यभर चर्चेचा विषय ठरते .  कडाक्याच्या थंडीची नाशिककर आतुरतेने वाट पाहत असतात.थंडीचा जोर वाढल्याने ,स्वेटर ,मफलर ,कानटोप्या यांच्या खरेदीचे प्रमाण वाढले आहे.  कालचे शहरातील   किमान तापमान 10.4 इतके तर कमाल तापमान 28.6 इतके नोंदवले गेले.  यंदा थंडीचा कडाका दर वर्षी इतका जाणवला नाही.मात्र आता थंडी वाढल्याने डिसेंबरच्या पुढील आठवड्यात आणि  जानेवारीत पारा आणखीन घसरण्याचा अंदाज  हवामान तज्ञांनी व्यक्त केली  आहे.

मागील पाच दिवसात तापमानात झालेली घट
किमान            कमाल
10 डिसेंबर         10.4           28.6
9 डिसेंबर          10.0           27.4
8 डिसेंबर          14.8           28.2
7 डिसेंबर          16.0           30.9
6 डिसेंबर          18.8           30.7

Ashvini Pande

Recent Posts

भैरवनाथ यात्रोत्सवात 27 वर्षांपासून मोफत चरणसेवा

सिन्नर : प्रतिनिधी सिन्नर शहराचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या यात्रेच्या निमित्ताने शहरातीलच नव्हे तर पंचक्रोशीतील…

20 hours ago

घरकुल अनुदानात 50 हजारांची वाढ, 15 हजारांच्या अनुदानासाठी सौर यंत्रणा आवश्यक

सिन्नर : भरत घोटेकर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या घरकुल लाभार्थ्यांना बांधकामांसाठी दिले जाणारे 1 लाख…

20 hours ago

इंदिरानगर कलानगर चौकात बसथांबा नसल्याने विद्यार्थी, प्रवासी त्रस्त

नाशिक : प्रतिनिधी वडाळा ते पाथर्डी रस्त्यावरील कलानगर चौकात बसथांब्याअभावी भरउन्हात विद्यार्थी व प्रवाशांना उभे…

20 hours ago

गंगापूररोडला झाडाने घेतला महिलेचा बळी

धोकादायक वृक्षांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर सिडको : विशेष प्रतिनिधी शहरातील उच्चभ्रू लोकवस्ती म्हणून नामांकित असलेल्या…

20 hours ago

शिंदे गावाजवळील बारदान गोडाऊनला भीषण आग

शिंदे गावाजवळील बारदान गोडाऊनला भीषण आग नाशिकरोड : प्रतिनिधी शिंदे गावाजवळील बारदान गोडावूनला अचानक पहाटे…

1 day ago

खुनाची मालिकाच सुरू, सिडकोत एकाची हत्या, कारवर हल्ला

एका संशयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात सिडको : विशेष प्रतिनिधी :सातपूर येथील रिक्षाचालकाचा टोळक्यांच्या हल्ल्यात खून…

1 day ago