नाशिक

गेल्या वर्षीच्या तुलनेत मे महिन्यातील वसुली घटली

२५ हुन १३ कोटी वसुली
नाशिक :  प्रतिनिधी
मनपा प्रशासनाकडून दरवर्षी करदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत बिल भरणा केल्यावर विशिष्ट सूट दिली जाते. यंदा एप्रिल महिन्यात कर अदा केल्यास एकूण रक्कमेवर नेहमीच्या पाच ऐवजी आठ टक्के सूट देण्यात आली. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला होता. दरम्यान गतवर्षी मे महिन्यात सवलत योजनेचा लाभ घेत तब्बल २५ कोटींचा भरणा झाला होता. मात्र ही वसुली यंदाच्या मे महिण्यात घटली असल्याचे चित्र आहे. हा आकडा चौदा कोटींच्या पुढे सरकु शकला नाही.
महापालिकेने नियमित करदात्यांसाठी सुरु केलेल्या करसवलत योजनेत मे महिन्यात तेरा कोटी ७९ लाख वसुली झाली आहे. २९ हजार लाभार्थ्यांनी सहा टक्के सवलतीचा लाभ घेत ४५ लाख ९० हजारांची सूट पदरात पाडली. पण गतवर्षीची आकडेवारी पाहता यंदा वसुलीचा रिव्हर्स गिअर पहायला मिळत आहे.
नवीन नाशिक मधील नागरिकांनी करसवलत घेण्यात आघाडीवर असून त्यांनी दोन कोटी ९२ लाखांचा भरणा केल‍ा. त्या खालोखाल नाशिकरोड विभागाचा क्रमांक लागतो.  पण गतवर्षी मे महिन्यात तब्बल पंचवीस कोटी भरणा झाला होता. गतवेळेच्या तुलनेत यंदा वसुलीत अकरा कोटींची घट पहायला मिळत आहे. दरम्यान चालू जून महिन्यातही करसवलत योजना सुरु असून एकूण रक्कमेवर तीन टक्के सूट मिळवता येईल. त्यास नाशिककरांनी बंपर प्रतिसाद दिला. तब्बल एक लाखांहून अधिक नागरीकांनी ५२ कोटींचा भरणा केला. गतवर्षी त्याच कालावधीत हा आकडा २९ कोटी इतका होत‍ा. यंदा एप्रिल महिन्यात तब्बल २२ कोटी मालमत्ता कर वसुली सरपल्स पहायला मिळाली. मे महिन्यात तीन टक्के सवलत दिली जाते. यंदा ती सहा टक्के करण्यात आली. पण एप्रिलच्या तुलनेत काहिसा थंड प्रतिसाद मिळाला. २९ हजार नागरिकांनी कर भरणा करत सहा टक्के सुटची संधी साधली.मे महिन्यात तेरा कोटी ७९ लाख मालमत्ता कर नागरिकांनी भरला.
मे महिन्यातील वसुली
न.नाशिक – ५७४१ – २ कोटी ९२ लाख
ना.रोड – ६९९० – २ कोटी ८५ लाख
सातपूर – ३४४३ – १ कोटी ५८ लाख
ना.पश्चिम – ३०७५ – १ कोटी ९८ लाख
ना.पूर्व – ५०२५ – २ कोटी १० लाख
पंचवटी – ४८७८ – २ कोटी ३३ लाख
Ashvini Pande

Recent Posts

साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…

22 hours ago

असामान्य अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…

22 hours ago

गणेशोत्सवात ‘गोदावरी महाआरती’ ठरणार नाशिकचा अभिमान

देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…

22 hours ago

पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला

गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…

23 hours ago

पिनाकेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळून दोन महिला ठार

बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…

23 hours ago

निफाड उपविभागात साडेतीन हजार स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरु

वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…

23 hours ago