नीलेश राणेंचे स्टिंग ऑपरेशन
सिंधुदूर्ग :
शिवसेना शिंदे गटाचे आमदार नीलेश राणे यांनी काल थेट मालवणमधील भाजपाचे पदाधिकारी विजय किनवडेकर यांच्या राहत्या घरी धाड टाकली. नीलेश राणे यांनी स्टिंग ऑपरेशन करत विजय किनवडेकर यांच्या राहत्या घरी पोहोचले. यावेळी नीलेश राणेंना विजय किनवडेकर यांच्या राहत्या घरी अवैध आणि हिशोबी नसलेली मोठी रोख रक्कम आढळून आली. यावर नीलेश राणेंचे बंधू मंत्री नितेश राणे यांनी आम्ही जर असा हंगामा केले तर काय होईल. हमाम खाने मे सब नंगे, अशा शब्दांत त्यांनी स्टिंग ऑपरेशनवर टीका केली.
रवींद्र चव्हाण मालवणमध्ये येऊन गेले. त्यानंतर वेगाने पैसे वाटपाची पद्धत सुरू झाली आहे, असे म्हणत नीलेश राणे यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप केले. पैसे वाटप करून निवडणूक लढवायची पद्धत आहे का? मैदानात येऊन लढा. त्या घरात अजून पैशाच्या बॅग आहेत, असा आरोपही नीलेश राणेंनी केला. भाजपचे कार्यकर्ते कोण कोण पैसे वाटप करतात, याची यादी देणार असून पप्पा तवटे, रुपेश कानडे, रणजीत देसाई, मोहन सावंत अंगावर पैसे घेऊन वाटत आहेत. रोज यांच्याकडे बॅग पोहोचवण्याची यंत्रणा तयार असल्याचा आरोपहीदेखील नीलेश राणेंनी केला. मी अनेक दिवसांपासून म्हणतोय की, रवींद्र चव्हाण जेव्हा जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतात तेव्हा वेगळं वातावरण निर्माण होतो. ते काल जिल्ह्यात आले. मला थोडा संशय आला की, हे असेच सहज आलेले नाहीत, अशी टीकाही नीलेश राणेंनी बोलताना केली.
नीलेश राणेंच्या मालवणमधील स्टिंग ऑपरेशननंतर आणि केलेल्या टीकेवरून राज्याचं राजकीय वातावरण चांगलचं तापल्याचं दिसून येत आहे. नीलेश राणेंच्या आरोपावर भाजपाकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं. भाजपचे नेते नितेश राणे यांनी रवींद्र चव्हाण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांना प्रत्येक जिल्ह्यातील कानाकोपर्यात जावं लागतं. राजकीय चष्म्याने त्याला पाहावं. उद्या आम्ही मंत्री उदय सामंत यांच्याबद्दल बोललो आणि असा धिंगाणा घातला तर?, असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला.
आमचे स्वतःचे व्यवसायपण असतात. स्वतःच्या व्यवसायासाठी घरात पैसे ठेवले तर त्यात चूक काय? आमच्या पक्षाची कोणी बदनामी करू नये. प्रत्येकाचे व्यवसाय आहेत.
युतीची चर्चा करण्याची वेळ निघून गेली : नितेश राणे
रवींद्र चव्हाण यांनी मला अजून पूर्णपणे ओळखलेलं नाहीय. आम्हाला युती करायची होती, तुम्ही का केली नाही?, तुम्ही साधा फोनही उचलला नाही, असे नीलेश राणे म्हणाले. भाजपचे पदाधिकारी रवींद्र चव्हाण यांच्या पगारावर आहेत, असेही नीलेश राणेंनी सांगितले. यावरदेखील नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजपची पद्धत आहे, केव्हातरी तुम्ही समजून घ्या. तो प्रक्रियेचा भाग असतो.
मला 2 तारखेपर्यंत युती टिकवायचीय : रवींद्र चव्हाण
शिवसेना आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवरून राज्यात महायुतीत मोठी कुस्ती सुरू झाली आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या तोंडावर रवींद्र चव्हाण यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला खिंडार पाडण्यास सुरुवात केल्याने शिंदे गोटात मोठी खळबळ उडाली होती. खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात चव्हाणांनी पक्षप्रवेश करण्यास सुरुवात केली आणि या वादाला ठिणगी पडली होती. उपमुख्यमंत्र्यांनी दिल्लीपर्यंत तक्रार करून झाली. परंतु काहीच फरक पडला नाही. अशातच बुधवारी आमदार नीलेश राणे यांनी मालवणमध्ये चव्हाण भेट देऊन गेलेल्या भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरावर धाड टाकत त्याच्या घरी पैशांच्या थप्प्या असलेली पिशवी पकडली होती. यावर आता चव्हाणांनी मोठे भाष्य केले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष गुरुवारी जळगाव दौर्यावर आले आहेत. यावेळी पत्रकारांनी नीलेश राणे यांच्या आरोपांवर प्रश्न विचारले. सुरुवातीला चव्हाण यांनी काढता पाय घेतला. परंतु नंतर कारची काच खाली करून मला 2 तारखेपर्यंत युती टिकवायची.
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…