नाशिक

थकबाकीदाराचे नळ कनेक्शन खंडित

मालेगाव महापालिकेची वसुलीसाठी कडक कारवाई

मालेगाव : प्रतिनिधी
मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या आदेशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त (महिला व बालकल्याण) तथा नियंत्रण अधिकारी, मुख्य निरीक्षक कर संकलन अधिकारी, सहाय्यक आयुक्त (कर) व जप्ती प्रमुख तथा प्रभाग अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी (दि. 11) प्रभाग क्रमांक 1 अंतर्गत कॅम्प भाग 2 येथील वसुली वॉर्डामध्ये थकबाकीदार मिळकतधारकांविरोधात कडक कारवाई करण्यात आली.
सदर वॉर्डातील एका घरमालकाची घरपट्टी व पाणीपट्टीची एकूण थकबाकी रक्कम रुपये 49 हजार रुपये इतकी असल्याने महानगरपालिकेच्या पथकाने त्यांचे नळकनेक्शन खंडित केले. ही कारवाई वॉर्ड लिपिक प्रदीप बच्छाव, नीलेश देवरे, जनार्दन खेरनार, वासू शिरसाट, भूपन कंदारे, चेतन शिरसाट व अमित पगारे
यांनी केली.
दरम्यान, आयुक्तांनी मालेगाव महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व थकबाकीदार मिळकतधारकांना आवाहन केले आहे की, नागरिकांनी अभय योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. घरपट्टी व पाणीपट्टी कराची थकबाकी एकरकमी भरून व्याज व शास्तीवर 70 टक्के सूट मिळवावी व कठोर कारवाई टाळावी, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

The defaulter’s water connection was disconnected.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

11 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

11 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

11 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

11 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

11 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

12 hours ago