संस्थाचालकाचा   वसतिगृहातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार 

 

पंचवटी : वार्ताहर

म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील एका निवासी वसतिगृहाच्या संस्थाचालकानेच वसतिगृहातील चौदा वर्षीय आदिवासी शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी संशयिताविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .संशयितास म्हसरूळ  पोलिसांनी ताब्यात घेतले असून हर्षद बाळकृष्ण मोरे (वय ३२ ) असे या संशयिताचे नाव आहे . या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे .

याबाबत अधिक माहिती अशी की,रासबिहारी लिंक रोडवर द किंग फाउंडेशन संचलित ज्ञानपीठ गुरुकुल आधार आश्रम आहे.गेल्या चार वर्षापासून या संस्थेचे कामकाज नारायण माने नगर येथील एका रो हाऊसमध्ये  सुरू होते.या संस्थेचा कारभार संशयित संस्था चालक हर्षद मोरे हा बघत होता.या निवासी वसतिगृहात जवळपास  एकूण तीस ते पस्तीस मुले मुली येथे वास्तव्यास होते.

मागील महिन्यात या संशयितांने पीडित चौदा वर्षीय मुलीस रात्रीच्या वेळी वसतिगृहातील पार्किंग मध्ये असलेल्या पत्राच्या शेडमध्ये नेऊन हात पाय दाबण्यास सांगितले.त्यानंतर तिला अश्लील व्हिडिओ बळजबरीने दाखवत तिच्यावर बलात्कार केला.या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधपासून संरक्षण अधिनियम अनुसूचित जाती व जमाती  अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *