चावू नये म्हणून आता केवळ कुत्र्यांंचे समुपदेशन करणे बाकी!

भटक्या कुत्र्यांवरील सुनावणीत सुप्रीम कोर्टाची टिप्पणी; तो कोणत्या मूडमध्ये कोण सांगेल?

नवी दिल्ली :
सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत बुधवारी (दि. 7) सुनावणी घेतली. लोकांना चावू नका, असा कोणीतरी कुत्र्यांना सल्ला द्यायला पाहिजे. कुत्र्याची चावण्याची मनस्थिती आहे की नाही, हे कोणीही जाणू शकत नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश विक्रम नाथ, संदीप मेहता आणि एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत बुधवारी सुनावणी घेतली. यावेळी न्यायाधीश नाथ म्हणाले, जेव्हा एखादी व्यक्ती दुचाकी किंवा सायकलवर असते, तेव्हा कुत्रे एखाद्याला चावू शकते. अथवा त्याचा पाठलाग करू शकते. त्यामुळे ती व्यक्ती पडू शकते अथवा अपघात होऊ शकतो.

न्यायाधीश नाथ यांनी वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांना विचारले, दुचाकी आणि सायकलींसाठी भटके कुत्रे धोकादायक असतात. तुम्ही दुचाकी कधी चालवली आहे का? त्यावर सिब्बल यांनी करियरच्या सुरुवातीला चालविल्याचे सांगितले. केवळ कुत्रे चावणे ही समस्या नाही. कुत्रे हे सायकलींच्या पाठीमागे लागतात. त्यावर सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटले की, प्रत्येक कुत्रा असे करत नाही. त्यासाठी ओळख पटविणे महत्त्वाचे आहे. त्यावर न्यायाधीश नाथ म्हणाले, की सकाळी कोणता कुत्रा कोणत्या मनस्थिती आहे, हे तुम्ही कसे ओळखणार? सर्व कुत्र्यांना निवारागृहात पाठविणे हे समस्येवरील उत्तर आहे का, असे सिब्बल यांनी युक्तिवाद करताना विचारले. हे ठरविण्यासाठी गल्ली अथवा रस्ते कुत्र्यांपासून मुक्त होण्याची गरज आहे, असे खंडपीठाने म्हटले आहे.
कुत्रे कंपाउंड आणि विद्यापीठात राहतात. विद्यापीठात असताना कुत्रे चावले नव्हते. जेएनयूमध्ये अनेक कुत्रे होते, ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी म्हटले. त्यावर न्यायाधीश मेहतांनी सांगितले की, सिब्बल यांच्याकडील माहिती जुनी
आहे.
एनएलएस बेंगळुरूमध्ये अनेकदा कुत्र्यांनी हल्ले केल्याचे रिपोर्ट आहेत. कुत्रे चावण्याचे प्रमाण कमी होण्याची गरज आहे. रस्त्यावरून कमी प्रमाण होण्याकरिता कुत्र्यांना गोळी मारावी, असे कुणीही म्हणत नाही.
या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरूच राहणार आहे.

परिसर कुत्र्यांनी मुक्त कसे होणार?
भटक्या कुत्र्यांची समस्या सोडविण्यासाठी वैज्ञानिक उपाय करावा, असे सिब्बल यांनी म्हटले. त्यावर न्यायाधीश मेहता यांनी म्हटले, केवळ कुत्र्यांचे समुपदेशन करणे बाकी राहिले आहे. त्याचा अर्थ तसा नसावा, तुम्ही खेळीमेळीत म्हटले असावे, असे कपिल सिब्बल यांनी म्हटले. विद्यापीठ, न्यायालयाच्या आवारात कुत्र्यांची काय गरज आहे? कुत्र्यांना त्याच परिसरात सोडल्यानंतर संस्थांचे परिसर कुत्र्यांनी मुक्त कसे होणार? त्यांना पुन्हा रस्त्यावर सोडावे का,असा प्रश्न करत खंडपीठाने चावू नये म्हणून आता कुत्र्यांना समुपदेशन करणे बाकी राहिले आहे.

The dogs are yet to be counseled!

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *