नाशिक

बाल येशू यात्रेचा समारोप

नाशिकरोड :  प्रतिनिधी

लाखो ख्रिस्ती भाविकांच्या उपस्थितीत नाशिकरोड येथील बाळ येशूच्या दोन दिवसाच्या यात्रेचा समारोप झाला. नाशिक-पुणे महामार्गावरील सेंट झेवियर्स शाळेच्या आवारात बाळ येशू मंदिर आहे. ही यात्रा दरवर्षी फेब्रुवारीच्या दुस-या आठवड्यात भरते. शाळेच्या मैदानात उभारलेल्या भव्य शामियान्यात पहिल्या दिवशी नाशिक धर्मप्रांताचे महागुरु बिशप ल्युडस डॅनिएल यांच्या प्रमुख उपस्थितीत मिसा (प्रार्थना) झाली.
शेवटच्या दिवशीही पहाटे सहा ते सायंकाळी सात या दरम्यान दर तासाला इंग्लिश, मराठी, कोकणी, तमीळ व अन्य भाषांमध्ये मिसा झाली. असंख्य भाविकांनी लाभ घेतला. नाशिकबरोबरच देशातून आलेल्या धर्मगुरुंनी मिसामध्ये मार्गदर्शन केले. फादर एरोल फर्नांडिस, फादर अगस्तीन डिमेलो, फादर टेरी, फादर बॉस्को, फादर टोनी, फादर लोबो आणि त्यांच्या सहका-यांनी केलेल्या नियोजनबध्द संयोजनामुळे यात्रा यशस्वी झाली. बाळ येशू मंदिराच्या आवारात पिलग्रीम आणि रिट्रीट सभागृहात गरीब भाविकांची निवासाची सोय करण्यात आली होती. पूजेच्या वस्तू, शीतपेयी, शोभीवंत व अन्य वस्तूंची तसेच फळांची दुकाने लागली होती. नाशिकरोड व परिसरातील हॉटेल्सला चांगली मिळकत झाली. भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासन, वाहतूक आणि उपनगर पोलिसांनी जय्यत तयारी केली होती. नेहरूनगर, जेतवननगर येथील मैदान वाहनांच्या पार्किंगने भरून गेले होते. मंदिरात दर्शनासाठी बॅरिकेंटींग, खासगी सुरक्षा रक्षक, सीसीटिव्हीची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे अनुचित गोष्टींना आळा बसला. मंदिर प्रशासनाकडून चौकशी व माहिती कक्ष स्थापन करण्यात आल्याने भाविकांना योग्य मार्गदर्शन मिळाले. वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर कदम, उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर, पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

देशातूनच नव्हे तर विदेशातूनही भाविक
गेली दोन वर्षे करोना संकटामुळे दोन वर्षे यात्रा भरली नव्हती. त्यामुळे यंदा पाच लाखावर भाविक आल्याचा दावा संयोजकांनी केला.यात्रेत विविध व्यावसायिकांनी दुकाने थाटली होती. सिटी लिंक बस, रिक्षा, अन्य खासगी वाहनांनी भाविक यात्रास्थळी आले. या सर्वातून लाखोंची उलाढाल झाली.

Ashvini Pande

Recent Posts

अवघा तो शकुन

चित्त सुप्रसन्न जे वेळ। तो पुण्यकाळ साधका॥ (एकनाथी भागवत अ. 19, ओवी 166) आपण गृहप्रवेश,…

1 minute ago

एकनाथ शिंदेंचा ‘जय गुजरात’चा नारा

उपमुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे राजकीय वादंग मुंबई ः राज्यात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून वातावरण तापले असताना राज्याचे उपमुख्यमंत्री…

18 minutes ago

पांढुर्ली-भगूर रस्ता दुरुस्तीचे काम वेगात

दै. गांवकरीच्या वृत्ताची दखल देवळाली कॅम्प : वार्ताहर भगूर-पांढुर्ली रस्ता अनेक दिवसांपासून खराब अवस्थेत असून,…

26 minutes ago

लिटल स्टार प्री-स्कूलमध्ये विठ्ठलनामाचा गजर

नाशिक : उत्तमनगर येथील पी. जी. माळी एज्युकेशन सोसायटी संचालित लिटल स्टार प्री-स्कूलमध्ये आषाढी एकादशी…

30 minutes ago

ऑयस्टरच्या चिमुकल्यांकडून आषाढी एकादशी

सिडको : अशोकनगर येथील विद्याधर एज्युकेशन फाउंडेशन संचालित ऑयस्टर प्ले-स्कूलमध्ये शुक्रवारी (दि. 4) चिमुकल्यांनी भक्तिभावात…

31 minutes ago

युगे अठ्ठावीस… विटेवरी उभा !!

लखमापुर :  वार्ताहर  युगे अठ्ठावीस विटेवरी उभा | वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा | पुंडलिकांचे…

39 minutes ago