महाराष्ट्र

ढोल पथकांची सज्जता शिवजयंतीचा उत्साह शिगेला

नाशिक ः प्रतिनिधी
अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या शिवरात्रीचा सण आणि शिवजयंती असे दोन सलग मुहुर्त आल्याने शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे उधाण आले आहे.
शिवजयंतीला ढोलपथकांसह मिरवणूका पाहण्यासाठी नागरिकांना पर्वणी मिळणार आहे.ढोल वादकांचा उत्साहही शिगेला पोहचला असून गेल्या काही दिवसांपासून सराव सुरू असल्याचे पथक प्रमुखांनी सांगितले.

 

 

 

यंदा शिवप्रेमींना ढोलताशंाच्या गजरात मिरवणूक आणि विविध मर्दानी खेळांच्या कसरती पहावयास मिळणार आहे. गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे सणसमारंभांना ढोलवादन करण्यास बंदी घालण्यात आली होती त्यांमुळे गेल्या वर्षी स्थिर वादन करण्यात आले होते.

 

 

 

नाशिक ढोल म्हणून नाशिकची ओळख बनू पाहत असलेल्या शहरातील अनेक ढोलपथकांना परराज्य,परदेशातूनही मागणी वाढली आहे.विशिष्ट धून या ढोलचे वैशिष्टे असल्याने लहानापासूंन मोठ्यांपर्यत सर्वाना या दणदणाटात पावले थिरकायला लावणारी असल्याची अनुभूती येते.त्यामुळे सण जयंती,लग्नकार्य विविध शुभकार्यात ढोलपथकांना पसंती मिळत आहे.

 

 

 

 

जिल्ह्यात 40 पेक्षा जास्त पथके असून शहर आणि उपनगरांमध्ये 25 ते 30 पथके आहेत.एका पथकात 150 ते 200 ढोलवादक आणि विविध खेळ सादर करणारे सदस्य आहेत.तीन वर्षापासून ते 50 वर्ष वयोगटातील सद्‌स्यांचा सहभाग असून काही पथकांमध्ये 70 पेक्षा अधिक महिला आणि मुलांचाही सहभाग आहे. नोकरी व्यवसाय सांभाळून वादनाची आवड म्हणून सराव करतात.सरावासाठी शहरापासून दूर किंवा मंगलकार्यालयातील मोकळ्या जागेत सायंकाळच्या वेळेत सराव करण्यात येतात.
महिलांचा सहभाग वाढता असून मिरवणूकीत ढोलपथकांतील महिला मुले पारंपरिक वेशभूषासंह साहसी प्रकार करण्यात येतात.
नववर्ष स्वागत,मिरवणुका,गणेशोत्सव,शिवजन्मोत्सव जयंतीनिमित्ताने ढोल ताशांचा दणदणाट आणि मिरवणूक मार्गावर विविध कसरतीं सादर केल्या जातात.गेल्या दोन वर्षात ढोल वादनाचा आवाज धुळीत विरला होता यंदा शिवजयंतीला ढोलताशंावरील धुळ झटकून शहरवासीयांना मिरवणूक आणि ढोलपथकांच्या शिवकालीन खेळांचे प्रदर्शन पहावयास मिळणार आहे.

 

 

 

 

 

गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे साजरा न झालेला शिवजन्मोत्सव या वर्षी अतिशय उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.रोज किमान 200 वादक गेल्या 20,25 दिवसापासून सायंकाळी सराव करीत आहेत.यंदा ढोल ताशा ध्वज मर्दानी खेळ,लाठी काठी आदी शिवकालीन खेळांचे सराव सुरू आहेत.
परराज्यातूनही वादनासाठी मागणी होत आहे.
रवि राऊत
ताल रुद्र ढोलपथक प्रमुख

 

 

 

 

 

नवा जोश नवा उत्साह घेवून यंदा ढोलपथक जोमाने तयारीला लागले आहे.नियमित सराव केला जात आहे.वादकांची सख्या वाढत आहे.शिवजयंतीला स्थिरवादनही केले जाते.मिरवणुकीतील वादनाने वादकांमध्येही उत्साह संचारतो विविध कसरतीमुळे दर्शकांनाही आनंद मिळतो.
नेहा जाधव,
कलाधिपती ढोल ताशा पथक

 

 

 

 

 

 

सर्व ढोल पथक शिवजयंतीसाठी तयार आहेत यंदा दोन मुहुर्त सोबत असल्यामुहे वादकांमध्ये ढोल वादनाचा आनंद दिृगुणीत झाला आहे.वादनाला उधार येणार आहे.
मिलिंद उगले (अध्यक्ष शिवतांडव प्रतिष्ठान)

 

 

 

 

Devyani Sonar

Recent Posts

साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज

गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…

2 days ago

जुने नाशिक भागात आमदार फरांदे यांनी साधला सवांद

नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी  आल्याने…

2 days ago

नांदगावमध्ये सुहास कांदे आणि समीर भुजबळांमध्ये राडा

नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…

2 days ago

यांनी बजावला मतदानाचा हक्क

नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…

2 days ago

जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान

  जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…

2 days ago

बनकर, कदम यांनी बजावला मतदानाचा हक्क

निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…

2 days ago